Parineeti Chopra Weight Loss

Parineeti Chopra Weight Loss: परिणिती चोप्रा लग्नानंतर वजन वाढल्यामुळे सतत चर्चेत होती. मात्र त्यामागे नक्की कारण काय होतं हे आता समोर आलंय. ‘चमकिला’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिने हे वजन वाढवलं होतं. साधारण १५ किलो वजन तिला वाढवावं लागलं होतं आणि भूमिकेत परफेक्ट दिसावं यासाठी परिणितीने तितके कष्ट घेत वजन वाढ केली होती. 

चमकिला सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजत असून आता पुन्हा पहिल्या आकारात येण्यासाठी परिणितीने जिममध्ये घाम गाळायला सुरूवात केली आहे. तब्बल १५ किलो वजन वाढ केलेल्या परिणितीला आता पुन्हा वजन कमी करावे लागत आहे आणि त्याची तयारी तिने सुरू केली आहे. (फोटो सौजन्य – @parineetichopra Instagram/iStock)

कसे वाढवले परिणितीने वजन 

परिणिती चोप्राने वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला असून त्यासह कॅप्शनमध्ये सांगितले की, तिने साधारण ६ महिने स्टुडिओमध्ये गाणे गात काढले आणि त्याशिवाय चमकिला चित्रपटासाठी तिने १५ किलो वजन वाढविण्यासाठी रोज जंक फूड खाल्ले. त्यावेळी म्युझिक आणि खाणं हेच तिच्यासाठी जग होतं असं तिने सांगितलं आहे. 

(वाचा – Manoj Jarange Patil | संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटात आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज)

वजन कमी करण्याची प्रक्रिया 

सध्या परिणिती तिचे वजन कमी करत आहे. त्यासाठी ती इंटेन्स वर्कआऊट करत असून पुन्हा आपल्या आकारामध्ये येण्याचा प्रयत्न करतेय. मात्र अजूनही काही इंच कमी करणे बाकी आहे. परिणिती पुन्हा एकदा फिटनेस रूटीन फॉलो करत असून वर्कआऊटसह तिने संतुलित डाएट फॉलो करायलाही सुरूवात केली आहे. 

(वाचा – Kartiki Gaikwad | असे पार पडले कार्तिकी गायकवाडचे डोहाळ जेवण, पाहा फोटो)

परिणिती लग्नानंतर पुन्हा कार्यरत 

परिणिती चोप्राने प्रसिद्ध राजकारणी राघव चड्ढासह काही महिन्यांपूर्वी लग्न केले. त्यानंतर तिचे वाढलेले वजन दिसून यायला लागले आणि त्यामुळे ती गरोदर असणाऱ्या चर्चांना सुरूवात झाली. मात्र आता हे वजन तिने चमकिला चित्रपटासाठी वाढविल्याचे समोर आले आहे आणि पुन्हा एकदा ती काम करायला लागली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *