छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आली. त्यात आता जय देव शिवराया या गाण्याची भर पडणार आहे. आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज लाभलेलं हे गाणं संघर्षयोद्धा चित्रपटात पहायला मिळणार असून, २६ एप्रिल २०२४ रोजी संघर्षयोद्धा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
(वाचा – Manoj Jarange Patil | ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला!)
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध संघर्षयोद्धा या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा आहे. या चित्रपटाचा टीजर, ट्रेलरसह उधळीन जीव , मर्दमावळा शिवरायांचा वाघ या गाण्यांना तुफान प्रतिसाद लाभला आहे. आता चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची नवी आरती या चित्रपटात गायली गेली आहे. उत्तम शब्द, ताल धरायला लावणारं संगीत आणि आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे.