स्मृती ईराणी करणार कमबॅकस्मृती ईराणी करणार कमबॅक

सर्वात लोकप्रिय टीव्ही सीरियल ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ परत येऊ शकते. हो, जर सगळं काही व्यवस्थित झालं तर टीव्हीची आदर्श सून तुलसी आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारा मुलगा मिहिर विराणी आता वेब सिरीजच्या रूपात ओटीटीवर येण्याची तयारी करत आहेत. २००० ते २००८ पर्यंत या शोच्या १,८३३ भागांनंतर, एकता कपूर आता त्यावर मर्यादित वेबसिरीज बनवण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आता समोर आले आहे. 

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, एकता कपूर सध्या तुलसी आणि मिहीर जोडीला मर्यादित मालिकेत आणण्यावर काम करत आहे. या मालिकेत स्मृती इराणी यांनी तुलसी विराणीची भूमिका साकारली होती, तर अमर उपाध्याय यांनी मिहीर विराणीची भूमिका साकारली होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्मृती इराणी या मालिकेद्वारे पडद्यावर पुनरागमन करणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. (फोटो सौजन्य – Instagram) 

स्मृती ईराणीचे कमबॅक

या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, माजी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या मालिकेत पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिकेत दिसू शकतात. असेही म्हटले जाते की ती या भूमिकेत पुन्हा एकदा भूमिका साकारण्यासाठी आजकाल स्मृती ईराणी खूप मेहनत घेत आहे.

Kapil Sharma Birthday: कपिलने घटवले 10 किलो वजन, दिवसभर काय खाल्ले आणि कसे केले वर्कआऊट

तशीच असणार टायटल थीम

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’चे टायटल थीम साँगही खूप लोकप्रिय झाले आहे. असे म्हटले जाते की हे थीम सॉन्ग पुन्हा मालिकेत समाविष्ट केले जाईल. एवढेच नाही तर ते पुन्हा त्याच पद्धतीने, त्याच घरात शूट केले जाईल. याचा अर्थ असा की तुलसी पुन्हा एकदा घराभोवती फिरत प्रेक्षकांना तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी ओळख करून देईल.

जूनमध्ये होईल घोषणा

एकता कपूर या वर्षी जून २०२५ मध्ये ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेबद्दल घोषणा करू शकते. तथापि, अहवालात असेही म्हटले आहे की जेव्हा एकता कपूर किंवा तिच्या बालाजी टेलिफिल्म्सशी याबद्दल संपर्क साधला गेला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ही बातमी आल्याने स्मृती ईराणीचे चाहते नक्कीच आनंदात असणार आणि तिच्या परतीकडेही डोळे लाऊन बसणार यात शंका नाही. 

Bigg Boss Marathi 5 : त्या टीमचे वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) एक शेपूट

कशी होती मालिकेची सुरूवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *