लोकप्रिय अभिनेता आणि ‘भारतीय जनता पार्टी’चे गोरखपूरचे खासदार रवी किशन सध्या चर्चेत आले आहेत. लखनऊमधील अपर्णा ठाकूर या महिलेने अभिनेत्यावर गंभीर आरोप केला आहे की, तो तिच्या मुलीचा बाप आहे आणि त्यांचे लग्न मुंबईत 1996 मध्ये मालाड येथे झाले होते. महिलेचे म्हणणे आहे की अभिनेता तिच्या मुलीला तिच्या दुसऱ्या लग्नापासून सामाजिक आणि कायदेशीररित्या स्वीकारत नाही. या आरोपामुळे पुन्हा एकदा रवी किशन वादामध्ये फसला आहे. (फोटो सौजन्य – @ravikishann Instagram/PTI)
मुलीचे वडील असल्याचा आरोप

भाजप खासदार रवी किशन हे आपल्या मुलीचे वडील असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. अपर्णा ठाकूर यांनी आपली मुलगी शेनोवासोबत लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजप खासदारावर गंभीर आरोप केले आणि ‘माझे नाव अपर्णा आहे आणि माझी मुलगी खासदार आणि अभिनेते रवी किशन यांची मुलगी आहे, जिला त्याने स्वीकारले नाहीये,’ असे सांगत “यासाठी मी कोर्टातही जाणार आहे.” असा इशाराही दिला आहे.
(वाचा – Divorce Reason | ५ कारणाने होतोय सर्वात जास्त घटस्फोट, तिसरे कारण वाचाल तर व्हाल हैराण)
योगी आदित्यनाथांकडे हक्काची मागणी
या महिलेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपल्या मुलीचा हक्क मिळवून देण्याची विनंती केली असून, माझ्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणीही महिलेने केली आहे. दरम्यान रवी किशनला कोणतीही इजा करण्याची आपली इच्छा नाही, पण ती आपल्या मुलीच्या हक्कासाठी न्यायालयात जाणार आहे असे तिने सांगितले.
रवी किशनसोबत लग्नाचा दावा

रवी किशनसोबतच्या लग्नाची माहिती देताना महिलेने सांगितले की, 1996 मध्ये मुंबईतील मालाडमध्ये त्यांचे लग्न झाले होते. तिच्या म्हणण्याप्रमाणे, हे लग्न कुटुंब आणि काही जवळच्या लोकांमध्ये झाले होते. त्यामुळे लग्नाचा कोणताही फोटो नाही, पण आता रवी किशन तिच्या मुलीला स्वीकारत नाही आणि तिला फक्त एकतर मुलगी दत्तक घ्यावी किंवा तिला योग्य हक्क द्यावा अशी मागणी आहे.
(वाचा – गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना जोडीदाराला आधाराची गरज)
रवी किशन म्हणतो ‘षडयंत्र’
‘PTI’ने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात रवी किशन यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर, ‘यूपी तक’ शी व्हॉट्सॲप कॉल दरम्यान रवीने यावर प्रतिक्रिया दिली आहे, “आधी आपण महिलेबद्दल शोधले पाहिजे आणि तिच्या पतीबद्दल आणि तो काय करतो हे देखील शोधले पाहिजे.” त्यांच्या मुलीचे शाळेपासून आतापर्यंतचे सर्व दाखलेही तपासावेत. ही महिला यापूर्वीही तुरुंगात गेली आहे. हे ‘समाजवादी पक्षा’चे षडयंत्र असल्याचे दिसते.” भाजप खासदार पुढे म्हणाले की, यावर मी कोणतेही उत्तर देणार नाही, गरज पडल्यास त्यांची पत्नी महिलेच्या वक्तव्याचा प्रतिकार करेन असे त्याने सांगितले.