Kartiki Gaikwad लवकरच आई होणार आहे. गायिका काही दिवसांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असली तरी तिच्या प्रेग्नंसीची चर्चा काही झाली नव्हती. पण तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो आल्यानंतर अनेकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. तिचे हे फोटो पाहून अनेकांनी तिच्या चेहऱ्यावर छान ग्लो आल्याचे देखील म्हटले आहे. कार्तिकीचे हे फोटो आणि तिचा हा लुक पाहुयात या बातमीतून
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

कार्तिकीने केली नाही घोषणा
कार्तिकीने आपल्या प्रेग्नंसीबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. तिच्या कोणत्याच कपड्यातून तिचा बंपही दिसला नव्हता. इतकेच काय तर तिने या दरम्यान अनेक कार्यक्रमही केले परंतु तिच्या या प्रेग्नंसीबद्दल कोणालाही संशय आला नाही. तिने ही गोड बातमी अगदी हुशारीने सगळ्यांपासून लपवून ठेवली. आता तिने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. कार्तिकीचे हे फोटो खूपच सुंदर आहेत. तिच्या डोहाळ जेवणाच्या एंट्रीपासून ते तिच्या या सोहळ्यातील खास क्षण फारच सुंदर टिपण्यास आले आहे.

कार्तिकीने हिरव्या रंगाची पैठणी परिधान केली असून त्यावर चंद्रकोर आहे. तिचा हिरवा कंच ब्लाऊज हा देखील त्यावर फारच उठून दिसत आहे. या लुकला अधिक सुंदर बनवत आहे ती म्हणजे तिने घातलेली फ्लोरल ज्वेलरी. अगदी पारंपरिक पद्धतीने तिने डोहाळ जेवण केले आहे. जे अतिशय सुंदर आहे.
Celebrity Good News | सेलिब्रिटी जे 2024 मध्ये होणार आई-बाबा

येत्या काही महिन्यात कार्तिकी-रोनित हे आई-बाबा होणार आहेत. याचा आनंद तिच्या चाहत्यांना नक्कीच आहे.