Celebrity Good News ऐकण्यासाठी त्यांचे फॅन्स हे कायम उत्सुक असतात. आपल्या लाडक्या सेलिब्सची होणारी मुलं कशी दिसतील. त्यांना मुलगा होईल की मुलगी हे पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स कायम उत्सुक असतात. यंदा 2024 ही अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आज आपण असे सेलिब्रिटी जोडपे पाहणार आहोत ज्यांच्याकडे लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.
रिचा चड्ढा- अली फैजल

2022 साली रिचा आणि अली यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या गुड न्यूजची प्रतिक्षा अनेकांना होती. त्यांच्या प्रेग्नंंसीची माहिती त्यांनी नुकतीच फेब्रुवारी महिन्यात दिली आहे. त्यांनी एक क्रिएटिव्ह पोस्ट तयार करुन ही माहिती दिली आहे. यात त्यांनी 1+1= 3 असे लिहीत आता दोघांमध्ये तिसरा येणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना अभिनंदनांची कमेंट केली आहे. रिचा चड्ढा ही लग्नाआधी प्रेग्नंट असल्याची चर्चाही होत होती. पण त्यावेळी ही बातमी केवळ अफवा होती. आताच्या त्यांच्या या पोस्टमुळे या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच हे दोघे आई-बाबा होणार आहेत.
यामी गौतम- आदित्य धार
छोट्या पडद्यावरुन चित्रपटात झळकलेला हा चेहरा अनेकांच्या आवडीचा आहे. 2021 मध्ये यामीने आदित्य धार सोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांच्या गुडन्यूजकडेही अनेकांचे लक्ष होते. यामी गौतमने तिच्या प्रेग्नंसीची माहिती कोणत्याही माध्यमातून दिलेली नव्हती. तिच्या आर्टिकल 370 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान तिने बेबी बंप दाखवून अनेकांना धक्का दिला. तिने ती 5 महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेकांना चांगलाच धक्का बसला. येत्या काही महिन्यात यामीच्या हातात बाळ असणार आहे.याचा आनंद तिने व्यक्त केला आहे.
वरुण- नताशा धवन

धवन कुटुंबातही लवकरच पाळणा हलणार आहे. वरुण धवन लवकरच बाबा होणार आहे. फेब्रुवारीत त्यांने नताशा प्रेग्नंट असल्याची गोड बातमी फोटो पोस्ट करुन शेअर केली होती. यामध्ये नताशाचा बेबी बंप दिसत आहे. त्यामुळे तिलाही येत्या काहीच महिन्यात बाळ होईल असा अंदाज लावला जात आहे. नताशा- वरुण हे लग्नाआधीपासून एकमेकांना ओळखत आहे. या दोघांमध्ये आधी मैत्री होती, त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाल आणि मग त्यांनी लग्न केले. नताशा या आधीही पापाराझींना स्पॉट झाली त्यावेळी तिचा बेबी बंप दिसत होता.
दीपिका- रणवीर सिंह
दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या गोड बातमीसाठी अनेक जण वाट पाहात होते. अखेर या जोडप्यानेही सगळ्यांना गुड न्यूज दिली आहे. 37 वर्षीय दीपिका आता लवकरच आई होणार आहे. त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेग्नंसीची न्यूज सांगितली होती. दीपिका तिच्या फाईटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फारशी दिसली नाही त्यावेळीच अनेकांना तिच्यावर संशय आला होता. शेवटी ही बातमी शेअर करुन त्यांनी त्यांचा आनंद फॅन्ससोबत शेअर केला आहे.
तर या काही जोड्या या वर्षात होणार आहेत गोंडस मुलांचे पालक.