इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामामध्ये युवा भारतीय अनकॅप्ड खेळाडूंची तुफानी कामगिरी पाहायला मिळत आहे. या बलाढ्य खेळाडूंमध्ये लवकरच टीम इंडियात संधी मिळविण्याची ताकद आहे. त्यांचा खेळ खूपच चांगला यादरम्यान बहरला असून चला अशा 5 खेळाडूंवर एक नजर टाकूया. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
मयांक यादव

आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) मधील सर्वात वेगवान गोलंदाज मयंक यादवची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. या आयपीएल हंगामात आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मयंक यादवने ताशी 156.7 किमी वेगाने चेंडू टाकला होता. मयंक यादव ताशी 156.7 किमी वेगाने चेंडू टाकून रातोरात स्टार झाला.
मयंक यादवमध्ये ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. मयंक यादवसारख्या धोकादायक वेगवान गोलंदाजाला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची क्षमता आहे. मयंक यादवला लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 च्या लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले.
रियान पराग

आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागची वेगळी शैली पाहायला मिळत आहे. रियान परागने आतापर्यंत IPL 2024 मध्ये 7 सामन्यात 63.60 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 161.42 च्या स्ट्राइक रेटने 318 धावा केल्या आहेत. रियान परागने IPL 2024 मध्ये आतापर्यंत 3 अर्धशतके झळकावली आहेत.
इतकंच नाही तर रियान परागचा टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये समावेश करण्याची मागणी होत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, निवडकर्ते रियान परागचा T20 वर्ल्ड कप 2024 च्या टीममध्ये समावेश करण्याचा विचार करत आहेत.
शशांक सिंह

आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंगने सामना पूर्ण करण्यात तो किती सक्षम आहे हे जगाला दाखवून दिले. आयपीएल 2024 मध्ये 4 एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या एका रोमांचक सामन्यात शशांक सिंग रातोरात प्रकाशझोतात आला.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात शशांक सिंगने 29 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. शशांक सिंगच्या खेळीच्या जोरावर पंजाबने टायटन्ससमोर 200 धावांच्या विशाल लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शशांक सिंगने आतापर्यंत IPL 2024 मध्ये 6 सामन्यांमध्ये 73 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 184.81 च्या स्ट्राइक रेटने 146 धावा केल्या आहेत.
(वाचा – राज्यातील आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ)
आशुतोष शर्मा

आशुतोष शर्माने आतापर्यंत IPL 2024 मध्ये 3 सामन्यात 47.50 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 197.91 च्या स्ट्राइक रेटने 95 धावा केल्या आहेत. 4 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात आशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. आशुतोष शर्माने आपल्या खेळीमुळे चांगलीच चर्चा निर्माण केली होती.
आशुतोष शर्माने क्षणार्धात गुजरात टायटन्सच्या (GT) जबड्यातून विजय हिसकावून घेतला. आशुतोष शर्मा यांचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला तर तो इंदूरमध्ये वाढला. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये आशुतोष शर्माने 11 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी खेळून युवराज सिंगचा विक्रम मोडला आणि आपल्या नावाचा बोलबाला केलाय.
अभिषेक शर्मा

अभिषेक शर्मा आयपीएल 2024 मधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा जीव आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड ही सलामीची जोडी सनरायझर्स हैदराबादला जवळपास प्रत्येक सामन्यात झंझावाती सुरुवात करून देत आहे. अभिषेक शर्माने आतापर्यंत IPL 2024 मध्ये 6 सामन्यात 35.17 च्या सरासरीने आणि 197.19 च्या स्ट्राईक रेटने 211 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मासारख्या खतरनाक फलंदाजाला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची क्षमता आहे.