Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जयस्वालने तुफानी खेळी करत शतक झळकावून राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा विजय मिळवून दिला. 9 गडी राखत सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. त्यासाठी यशस्वी जयस्वालने 60 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 7 षटकार मारले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 18.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 183 धावा करून सामना जिंकला. संजू सॅमसन 28 चेंडूत 38 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. जोस बटलरने 25 चेंडूत 35 धावा केल्या. (फोटो सौजन्य – Instagram)
यशस्वीचा विक्रम

या सामन्यात शतक झळकावून यशस्वीने आयपीएलमध्ये इतिहास रचला. 23 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी स्पर्धेत दोन शतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला. यशस्वीने गेल्या वर्षी वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्ध 124 धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांचे वय 21 वर्षे 123 दिवस होते. आता जयपूरमध्ये नाबाद 104 धावा केल्या. वयाच्या 22 वर्षे 116 दिवसात त्याने आयपीएलमधील दुसरे शतक झळकावले आहे आणि एक नवा इतिहास रचलाय.
(वाचा – RCB Vs KKR | Live मॅचमध्ये विराट कोहलीचा रूद्रावतार व्हिडीओ व्हायरल, BCCI कडून होऊ शकते शिक्षा)
एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके

यशस्वीने मुंबईविरुद्ध दुसरे शतक झळकावले. एका संघाविरुद्ध दोन शतके ठोकणारा तो पाचवा फलंदाज आहे. या बाबतीत केएल राहुल पहिल्या स्थानावर आहे. त्याने मुंबईविरुद्ध 3 शतके झळकावली आहेत. ख्रिस गेलने पंजाब किंग्जविरुद्ध 2 शतके, विराट कोहलीने गुजरात लायन्सविरुद्ध 2 शतके, डेव्हिड वॉर्नरने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 2 शतके झळकावली आहेत. जोस बटलरने कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत. आता या यादीत यशस्वीचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे.
(वाचा – CSK Vs LSG | लखनऊने रोखला CSK चा विजयरथ, के एल राहुलची धमाकेदार खेळी)
राजस्थानची विशेष कामगिरी

पहिल्या आठ सामन्यांमध्ये सात सामने जिंकणारा राजस्थान संघ आयपीएलच्या इतिहासातील पाचवा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सने 2010 मध्ये पहिल्यांदा ही कामगिरी केली होती. पंजाब किंग्सने 2014 मध्ये, चेन्नई सुपर किंग्सने 2019 मध्ये आणि गुजरात टायटन्सने 2022 मध्ये ही कामगिरी केली होती. यापैकी फक्त गुजरातचा संघच त्या मोसमात चॅम्पियन होऊ शकला.
(वाचा – MI Vs PBKS | IPL 2024: पंजाबवर MI ने मिळवला रोमांचक विजय, पंजाबच्या जबड्यातून खेचून आणला सामना)
बालेकिल्ल्यात गाजवले
राजस्थानने या मोसमात आपल्या घरच्या मैदानाचे रूपांतर बालेकिल्ल्यात केले आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर त्याने या मोसमात पाच सामने खेळले आहेत. या काळात या संघाने चार सामने जिंकले आहेत. राजस्थानचा संघ फक्त एकच सामना हरला होता. गेल्या वर्षी हा विक्रम पूर्णपणे वेगळा होता. 2023 मध्ये, राजस्थान संघ जयपूरमध्ये पाच पैकी चार सामने गमावला होता. त्यावेळी फक्त एकच सामना जिंकला होता.