कोणत्याही महिलेसाठी आई होणं ही एक वेगळीच भावना आहे आणि आपलं मूल सुदृढ जन्माला यावं हे प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी तुम्ही जर बाळाचा विचार करत असाल तर त्याआधी प्रीनेटल टेस्टिंग नक्की करायला हवं. या टेस्टमुळे आईचे आरोग्य आणि मुलांमध्ये काही जेनेटिक कंडिशन असेल तर आधीच समजून घेण्यास मदत मिळते. गरोदरपणादरम्यान आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला महत्त्व आहे. कोणतेही पोषक तत्व कमी झाल्यास, त्याचा परिणाम डायरेक्टली बाळावर होत असतो. त्यामुळे आईने Prenatal Testing करून घेण्याचा सल्ला डॉ. तलत खान, डॉक्टर इन चार्ज – मेडिकल जेनेटिक्स, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड यांनी दिला आहे. जाणून घेऊया अधिक माहिती. (फोटो सौजन्य – iStock)
प्रीनेटल टेस्टिंग का गरजेचे?

AICOG ने दिलेल्या गाईडलाईन्स आणि FOGSI ने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, सर्व गरोदर महिलांना प्रीनेटल टेस्टिंग करून घ्यायला हवे. विशेषतः ३५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना याची अधिक गरज आहे. यासह अॅबनॉर्मल USG, पॉझिटिव्ह स्क्रिनिंग टेस्ट, कौटुंबिक इतिहास, जेनेटिक कंडिशन या सगळ्याबाबत अहवालातून महत्त्वपूर्ण माहिती कळते. योग्य टेस्टची निवड करा आणि आपल्या गायनेकॉलॉजिस्टकडून सल्ला घेऊन तुम्ही प्रीनेटल टेस्टिंग नक्की करा.
(वाचा – Normal Delivery Exercise | नॉर्मल डिलीव्हरीसाठी असा करा व्यायाम)
जन्मजात आजाराबाबत माहिती
गरोदरपणादरम्यान २ पद्धतीने प्रीनेटल टेस्टिंग करण्यात येते. पहिली तपासणी गर्भात असणाऱ्या बाळाला कोणत्याही क्रोमोसोमसंबंधी असामान्यता नाही ना याबाबत करण्यात येते. तर दुसऱ्या पद्धतीला डायग्नॉस्टिक टेस्टिंग असे म्हटले जाते. यामुळे बाळाला कोणताही जन्मजात आजार असू शकतो की नाही याबाबत कळते.
स्क्रिनिंग आणि डायग्नोस्टिक टेस्ट

स्क्रिनिंग आणि डायग्नोस्टिक टेस्ट ही गरोदरपणापूर्वी वा दुसऱ्या ट्रिमस्टरमध्ये करण्यात येते. यामध्ये अल्ट्रासाऊंड स्कॅन आणि आईच्या रक्ताचा नमुना घेतला जातो. काही महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत Dual Marker, Non-Invasive Prenatal Testing करण्याचा सल्ला देण्यात येतो, ज्याला इंटीग्रेटेड अथवा कंबाईन स्क्रिनिंग असे म्हटले जाते. १ आठवड्यात याचा अहवाल येतो. जर याचा रिपोर्ट सकारात्मक आला तर पुढे डायग्नोस्टिक टेस्टसाठी सांगण्यात येते.
(वाचा – पुरुष व महिलांसाठी हस्तमैथुन चांगले की वाईट? काय सांगतात डॉक्टर…)
क्रोमोसोमसंबंधित आजार
डायग्नोस्टिक टेस्ट अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये ९९.९% भ्रूणामध्ये असणाऱ्या क्रोमोसोमसंबंधित आजाराबाबत माहिती मिळते. यामध्ये कोरियोनिक विलस सँपलिंग टेस्ट करण्यात येते, जी साधारण १०.५ अथवा १३.५ व्या आठवड्यात केली जाते. तर एम्नियोसेंटेसिस ही टेस्ट गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यानंतर केली जाते. या तपासणीचे रिपोर्ट साधारण २ आठवड्यात मिळतात.
कधी करावी प्रीनेटल टेस्टिंग

प्रीनेटल टेस्टिंग साधारणतः गर्भावस्थेच्या ११ व्या ते १३ व्या आठवड्यात केली जाते. तुम्ही जर बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहात, तर कुटुंबातील जेनेटिक आजार अथवा शारीरिक त्रासांबाबत जाणून घ्यायला हवे, जेणेकरून बाळाला त्याचा पुढे काहीही त्रास होणार नाही. याची माहिती करून घेणे हे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य आहे.