Cinnamon And Lemon For Beard Growth: आजकाल दाढीचादेखील परफेक्ट लुक असतो. दाढी नीट राहावी, नीट दिसावी यासाठी वेगवेगळे जेल अथवा तेलदेखील वापरण्यात येते. बिअर्ड लुक तरूण मुलांमध्ये अधिक ट्रेंडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. फिल्म स्टार असो वा क्रिकेटर, स्पोर्ट्समन असो वा अगदी मिसरूड फुटलेला मुलगा सर्वांनाच दाढी हल्ली आवडत असल्याचे दिसून येत आहे.
काही जणांना मात्र दाढी घनदाट येत नाही आणि त्यामुळे त्यांना नक्कीच चिंता वाटत राहाते. शरीरातील हार्मोनच्या कमतरतेमुळे दाढीचे केस वाढत नाहीत. टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता दाढी अथवा शरीरावर कमी केस उगवते. तुम्हाला जर दाढीत कमी केस आहेत असं वाटत असेल तर तुम्ही बिअर्ड ग्रोथसाठी दालचिनी पावडर आणि लिंबाचा वापर करून घेऊ शकता.
दाढी वाढविण्यासाठी तुम्ही जर घरगुती उपाय शोधत असाल तर दालचिनी आणि लिंबू हा उत्तम उपाय आहे. याचा नक्की कसा वापर करायचा हे या लेखातून आम्ही देत आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
बिअर्ड ग्रोथसाठी दालचिनी-लिंबाचे फायदे

चांगली आणि घनदाट दाढी येण्यासाठी दालचिनी आणि लिंबाचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. याचा नियमित स्वरूपात वापर केल्याने दाढीचे केस घनदाट होतात आणि लुकदेखील चांगला होतो. एससीपीएम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. सुमन यांनी सांगितले की, ‘दालचिनी आणि लिंबामधील गुण हे चेहऱ्यावरील रोमछिद्रे खुले करतात आणि केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. नियमित स्वरूपात दालचिनी पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करून दाढीला लावल्यास, दाढी घनदाट होण्यास मदत मिळते.’
(वाचा – Skin Care Tips: गरम पाण्याने धुताय चेहरा? उडून जाईल चेहऱ्याचा रंग व्हा सावध!)
दालचिनी-लिंबाचा वापर

दाढी वाढविण्यासाठी तुम्ही दालचिनी पावडर आणि लिंबाच्या रसाचा वापर हा सोप्या पद्धतीने करू शकता. याच्या स्टेप्स आम्ही देत आहोत –
- सगळ्यात पहिले दालचिनीचे तुकडे घ्या आणि त्याची पावडर बनवा. हवं असल्यास, मार्केटमधूनही दालचिनीची तयार पावडर आणू शकता
- २ चमचे दालचिनी पावडरमध्ये १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा
- त्यानंतर ही पेस्ट २-३ मिनिट्स फेटत राहा
- नंतर दाढीला जिथे कमी केस आहेत वाटत असेल तिथे लावा
- २० मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग पाण्याने धुवा
(वाचा – Pollution & Skin | प्रदूषणाचा त्वचेवर दिसून येत आहे हा परिणाम)
काय होतो परिणाम

दालचिनी पावडर आणि लिंबाच्या रस तुम्ही दाढीवर लावल्यानंतर छिद्र ओपन होतात आणि रक्तप्रवाह वाढण्यास मदत मिळते. नियमित स्वरूपात याचा वापर केल्याने दाढी चांगली वाढते. लक्षात ठेवा, ही पेस्ट लावण्यापूर्वी तुम्ही नक्की पॅच टेस्ट करून घ्या. तुम्हाला कोणतीही अलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नका. आठवड्यातून २-३ वेळा याचा उपयोग केल्यास तुम्हाला फायदा मिळतो.