भारत देश हा रामराज्य म्हणून ओळखला जातो. नुकतेच अयोध्येत राम मंदीर बांधण्यात आले आहे. तर १७ एप्रिल रोजी देशभरात राम नवमी जल्लोषात साजरी केली जाणार आहे. राम नवमीच्या पवित्र दिवशी तुमच्याही घरामध्ये रामाचा अंश जन्माला आला असेल आणि तुम्ही रामभक्त असाल तर बाळासाठी रामाच्या अर्थाची काही आधुनिक नावे आम्ही या लेखातून देत आहोत.
राम म्हणजे आदर्श पुरूष. आजही रामाची पूजा मनोभावे केली जाते आणि रामजन्म मोठ्या थाटात देशभरात साजरा होतो. तुम्हाला तुमच्या बाळासाठी जर रामाच्या नावाच्या अर्थाची पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घालून काही नावांचा शोध घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यसाठीच आहे. वाचा काही खास नावांची यादी अर्थासह (फोटो सौजन्य – Canva/iStock)
मुलांसाठी रामाची आधुनिक नावे

नावे | अर्थ |
अयांश | रामाच्या नावापैकी एक, सूर्याचे पहिले किरण |
अव्युक्त | अत्यंत निर्मळ मनाचा, विष्णू – रामाच्या नावापैकी एक |
कियांश | सर्वगुणसंपन्न, रामाप्रमाणे सर्व गुण असणारा |
अव्यान | कोणताही दुर्गुण नसणारा व्यक्ती, रामासारखा |
रिहान | शत्रुचा नाश करणारा, विष्णूचे नाव |
अद्विक | अत्यंत वेगळा असा, सर्वांपेक्षा वेगळा |
शर्विल | रामाचा अंश, शिवाचा अंश |
हृिदान | हृदय, मन, निर्मळ मन |
कियान | देवाचा आशिर्वाद, रामाचा आशिर्वाद |
रेयांश | सूर्याचे पहिले किरण, विष्णूच्या नावांपैकी एक |
(वाचा – Makarsankrant 2024 | Bornhan | तुमच्या बाळाचे आवर्जून घाला ‘बोरन्हाण’)

मुलांसाठी रामाची नावे अर्थासह
नावे | अर्थ |
अभिराम | रामाचे एक नाव |
धन्विन | खांद्यावर धनुष्य वाहणारा, पराक्रमी |
दशरथी | दशरथाचा मोठा मुलगा, रामाचे एक नाव |
जैत्र | पराक्रमी, शौर्यवान |
जानकीनाथ | सीतेचा पती राम |
कौशल्येय | कौशल्येचा पुत्र |
रघुवीर | पराक्रमी असा पुत्र, पराक्रमी राम |
राजीवलोचन | कमलनयनी, कमळाच्या आकाराचे डोळे असणारा |
सर्वेश | सर्व देवतांचा देव |
सत्यव्रत | नेहमी सत्य बोलणारा, कधीही खोटे न बोलणारा |
रामाच्या नावावरून प्रेरित नावे

नावे | अर्थ |
शाश्वत | कधीही न संपणारा, कायम जिवंत असणारा |
वराध्य | वरदान देणारा देव |
यज्ञेश | त्यागाची देवता, रामाप्रमाणे त्याग करणारा |
अद्वैत | सर्वांपेक्षा वेगळा असणारा व्यक्ती |
आरीव | सर्वात हुशार, सर्वात हुशार असणारा देव |
जैविक | अत्यंत पवित्र |
मोक्षित | सर्व गोष्टींपासून दूर राहणारा, मोक्ष |
ताश्विन | अत्यंत सुंदर, सर्वात सुंदर दिसणारा |
अहिल | राजपुत्र, राजकुमार |
आरूष | अत्यंत शांत, शांत मनाचा |