अर्थात हस्तमैथुन हा एक असा विषय आहे ज्यावर सहसा आपण चारचौघांत बोलणं टाळतो. पण हा विषय जितका संवेदनशील आहे तितकाच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा सुध्दा आहे. मास्टरबेशनविषयी लोकांमध्ये बरेच मिथक किंवा चुकीची माहिती आहे. डॉक्टर सांगतात की, हस्तमैथुन किंवा मास्टरबेशन हे एक सामान्य शारीरिक कार्य आहे. मात्र त्याचा अतिरेक वाईट. त्याची चुकीची सवय तुम्हाला लागता कामा नये, नाहीतर तुमच्या शारिरीक तसेच मानसिक आरोग्यावर, तुमच्या पार्टनरसोबतच्या नात्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

याविषयी आम्ही एका सेक्स एक्सपर्टशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, हस्तमैथुन ही एक नॅचरल प्रोसेस आहे, हो पण कधी कधी काही लोक याच्या अधिन जातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. बहुतेकजण त्यांच्या adolescense  किंवा पौगंडावस्थेमध्ये हस्तमैथुन करतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर म्हणजे शरीरावर, प्रजननक्षमतेवर किंवा लैंगिकतेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. परंतु, हस्तमैथुनाशी संबंधित ‘अपराधी भावना’ किंवा guilt  व्यक्तीच्या भावनिक आरोग्याला आणि आत्मसन्मानाला हानी पोहोचवू शकतो.

एक दिवसात किती वेळा हस्तमैथुन करावे यासाठी कोणतीही ‘संख्यात्मक’ सुरक्षा मर्यादा नाही. जेव्हा ती एक compulsary habit  बनते आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील इतर महत्त्वपूर्ण पैलूंवर मर्यादा घालू लागते तेव्हाच तो चिंतेचा विषय बनतो. उदाहरणार्थ, जर एखादा तरुण विद्यार्थी मास्टरबेशन addict झाल्यामुळे त्याच्या अभ्यासातून/करिअरपासून दूर गेला असेल किंवा त्याने socialize करणे थांबवले असेल, तर तो अनेक करिअरच्या संधी गमावू शकतो आणि तो स्वतः चं खूप नुकसान करून घेतोय , ज्यामुळे त्याच्या जीवनात आणखी समस्या निर्माण होऊ शकतात.

इतरांसमोर हस्तमैथुन केल्यास, कृती दरम्यान आणि नंतर योग्य स्वच्छता नाही राखल्यास, अंगाला इजा होऊ शकते अशा पद्धतीने हस्तमैथुन केल्यास ते असामान्य किंवा हानिकारक मानले जाऊ शकते.  आपले गुप्तांग नेहमी स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे, म्हणून या कृती दरम्यान आणि नंतर योग्य स्वच्छता राखलाच पाहिजे अन्यथा गुप्तांगांना इन्फेकशन चा धोका असतो. 

हस्तमैथुनाचे फायदे

जर जोडीदार संभोग करण्यास इच्छुक असताना देखील, एखादा व्यक्ती हस्तमैथुनाचा पर्याय निवडतो तर यावर विचार करण्याची गरज आहे हे बिलकूल सामान्य नाहीये.  जर ते एक ‘ध्यान’ बनले आणि एखाद्याच्या जीवनातील इतर पैलूंवर परिणाम करू लागले तर मात्र ते खूप हानिकारक आहे.

हो, हस्थमैथुनाचे काही फायदे सुद्धा आहेत.  जस कि हस्तमैथुन केल्याने व्यक्तीला इतरांसोबत लैंगिक क्रियाकलाप न करता लैंगिक समाधान मिळते. याशिवाय हस्तमैथुन लैंगिक तणाव दूर करते आणि एखाद्याला स्वतःची sexuality  आणि शरीरासह जास्त comfortable होण्यास  मदत करते. हस्तमैथुनामुळे गर्भधारणा होण्याचा किंवा एसटीडीचा प्रसार होण्याचा कोणताही धोका हि  नसतो. हस्तमैथुनाद्वारे, एखादी व्यक्ती उत्तेजित व्हायला कसे आवडते हे शिकू शकते कारण स्वतःच्या शरीराबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे आणि एकदा लैंगिक संबंधात आल्यावर, ती व्यक्ती जास्तीत जास्त आनंद मिळवण्यासाठी ही माहिती त्याच्या जोडीदारासोबत शेअर करू शकते. पुरुषांसाठी, स्टॉप-स्टार्ट तंत्राने हस्तमैथुन केल्याने  म्हणजे (ऑर्गॅझमच्या अगदी अगोदर उत्तेजना थांबवणे, नंतर कामोत्तेजक भावना कमी झाल्यावर पुन्हा स्वतःला स्पर्श करणे) यामुळे ejaculatory कंट्रोल विकसित केल्या जाऊ शकतो. 

जर तुम्ही मास्टरबेशन ऍडिक्ट असाल तर तुम्ही समाजात कसे वागता, कसे विचार करत, आणि तुमच्या  भावना यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या वर्तणुकीतील बदल पाहाल जे तुमच्या पर्सनल आणि social life  वर परिणाम करू  शकतात. तुम्हाला अशा परिस्थितीत नक्कीच पडायचे नाही, हो ना ? 

हस्तमैथुन कसे थांबवायचे?

तर सर्वात आधी तुम्हाला ही एक समस्या आहे हे मान्य करून ते थांबवणे आणि नंतर ती कमी करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता आपण काही फॅक्टस  ऐकू  जे तुम्ही जास्त प्रमाणात हस्तमैथुन करत आहात हे दर्शवू शकतात.

  • हस्तमैथुन करण्यासाठी काम, शाळा आणि social gatherings  वगळणे.
  • ते करण्याची अनियंत्रित इच्छाशक्ती.
  • गरज पडल्यास  कुठेही करायची तयारी असणे.

    जर हस्तमैथुन हाताळणे कठीण होत असेल तर याचा अर्थ तुम्हाला समस्या आहे आणि आपण काही सोप्या ideas ऐकणार आहेत ज्या तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील.

1. पॉर्नोग्राफी अव्हॉइड करा: जे लोक खूप हस्तमैथुन करतात त्यांच्यासाठी पोर्नोग्राफी हे एक मानसिक ड्रायव्हिंग एजंट आहे. हे एखाद्या व्यक्तीवर मानसिकरित्या अशा प्रकारे प्रभावित होते की ते संपूर्ण समाजात त्यांच्या विचार करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीला आकार देतात. अश्लील चित्रे, व्हिडिओ आणि वेबसाइट्स शोधणे टाळा जे तुम्हाला त्या विचारात परत आणू शकतात.

2. फोकस वळवा: तुमचे मन वळवणे आणि दुसरे काहीतरी करणे हा एक मार्ग आहे जो तुम्हाला यात  मदत करेल. नवीन छंद लावण्याचा विचार करा आणि हे हस्तमैथुन करण्यात घालवलेल्या वेळेची जागा घेऊ शकते. तुमच्या वैयक्तिक उद्दिष्टांवर काम करण्यास सुरुवात करा आणि त्यांना वैयक्तिक डायरीमध्ये लिहा. स्वतःला सांगा की तुम्ही ते साध्य कराल आणि हेच  तुम्हाला मजबूत ठेवेल. हे तुम्हाला तुमची उर्जा इतर गोष्टींवर  केंद्रित ठेवण्यास मदत करेल आणि हस्तमैथुन करण्याचा विचार करण्यापासून लांब ठेवेल. 

3. डॉक्टरांचा सल्ला घ्या: मित्रांनो तुम्हाला तुमची समस्या बोलून दाखवायची आहे. आपण हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की आपण यासोबत एकटे लढू शकत नाही. हेल्थकेअर तज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच प्रदान करतील जे तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करतील. असं न केल्यास याचा तुमच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला ओबेसिव्ह -कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) मुळे त्रास होऊ शकतो ज्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात. म्हणून सिटूएशन नियंत्रणाच्या बाहेर जाण्याआधी मानसशास्त्रज्ञ किंवा थेरपिस्टशी बोला . 

4. Socialize व्हा: तुम्हाला एकटेपणा जाणवत असल्यास तुम्ही समाजात मिसळा.  होय, एकटं  मन आपण कधीही विचार करू शकत नाही त्यापेक्षा बरेच नुकसान करू शकते. socialization मुळे  तुमचे मन फोकस्ड  आणि diverted राहील. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक उत्पादनक्षम ठेवण्यासाठी कुटुंब, मित्रांसोबत सामील व्हा किंवा जिममध्ये जा.

5. नियमित व्यायाम: जसे की रोज १ तास वर्कआऊट करणे किंवा जॉगिंग, मॉर्निंग किंवा नाईट वॉक करणे, प्राणायम किंवा योगा करणे.

हस्तमैथुन आणि मानसशास्त्र

मानसिक दुष्परिणाम: मानसशास्त्रीयदृष्ट्या बोलायचे झाल्यास, अति हस्तमैथुन ही आतील  लढाई आहे. यामुळे  काही घटनांबद्दलची तुमची धारणा बदलू लागते आणि तुमच्या वर्तणुकीतहि  बदल दिसतो जसा की धार्मिक विचार पुढे ढकलले जाणे, खराब लैंगिक संवाद, तुमच्या जोडीदाराशी अनावश्यक लैंगिक संघर्ष आणि नातेसंबंधातील समस्या.

मित्रांनो लक्ष्यात ठेवा हि सवय जास्त गंभीर होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा की हस्तमैथुन करणे आरोग्यदायी आणि प्रत्येक माणसासाठी चांगले आहे, परंतु ते जास्त प्रमाणात केल्याने पुढील कॉम्प्प्लिकेशन्स देखील होऊ शकतात.


महिलांनी हस्तमैथुन करावे का?

महिलांनी, सांस्कृतिकदृष्ट्या, नेहमीच एकतर त्यांच्या अंतर्भूत लैंगिक इच्छा ओळखू नयेत किंवा त्यांच्या लैंगिक इच्छेवर सहज मात करावी अशी यांच्याकडून अपेक्षा असते. इथे, स्त्रीसाठी आनंद अनुभवण्याची भावना लाज आणि अपराधीपणाचे ओझे घेऊन येते.

“वीरे दी वेडिंग” या चित्रपटाने भारतीय महिलांनी त्यांची लैंगिक इच्छा कशी प्रदर्शित करावी आणि ‘काय करू नये’ यावर जोरदार वादविवाद घडवून आणले. स्त्रिया आणि लैंगिकतेबाबत भारतीय मानसिकता कुठे उभी आहे हे यातून समोर येते.  

बर्याच स्त्रिया त्यांच्या लैंगिकता आणि त्यांच्या शरीराबाबत comfortable  नाहीत. जेव्हा त्याचा  त्यांच्या जोडीदारांशी घनिष्ठ संबंध येतो तेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या आवडी-निवडी माहित नसतात. अनेक महिलांना त्यांच्या शरीराच्या एका विशिष्ट भागाची माहितीही नसते, ज्याला क्लिटॉरिस म्हणतात. खरं तर, लैंगिक शिक्षण वर्ग किंवा संभाषणांमध्ये क्लिटॉरिसचा उल्लेख देखील केला जात नाही, कारण स्त्रियांसाठी लैंगिक आनंद मुख्यत्वे केवळ पेनिट्रेशन मुळे आहे असे  ओळखले जाते.

क्लिटॉरिस हा स्त्री प्रजनन प्रणालीच्या व्हल्व्हामध्ये इरेक्टाइल टिश्यूने बनलेला एक लहान, संवेदनशील अवयव आहे. त्यात हजारो मज्जातंतूं आहे ज्यामुळे तो अत्यंत संवेदनशील अवयव बनतो. हस्तमैथुन केल्याने क्लिटोरिस उत्तेजित होते आणि लैंगिक सुखाच्या संवेदना निर्माण होतात.

हस्तमैथुन खरंतर स्त्रियांना स्वतःचे शरीर अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकते आणि ते कोणत्याही लाज किंवा अपराधीपणाशिवाय ते करू शकतात. खरं तर, काहीही असल्यास, हस्तमैथुन स्त्रीचा तिच्या जोडीदारासोबतचा लैंगिक अनुभव वाढवण्यास मदत करू शकते.

स्त्रियांनी हस्तमैथुन कधी करू नये?

  • जेव्हा तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या गुप्तांगाला स्पर्श करता आणि नंतर तुमच्या गुप्तांगाला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला लैंगिक संक्रमित संसर्ग (STIs) होऊ शकतो. तुम्ही तुमची सेक्स toys  एखाद्या संक्रमित व्यक्तीसोबत शेअर केल्यास देखील STI होऊ शकतात.
  • जर तुम्ही आक्रमकपणे हस्तमैथुन केले तर तुमच्या योनीला दुखापत होऊ शकते.
  • गरोदर असताना स्त्रियांनी मुळीच मास्टरबेशन करु नये.

एक्सपर्टकडून आपण हस्तमैथून आणि आरोग्य या संबंधित बरीच माहिती जाणून घेतली. हस्तमैथुनाचे तोटे आणि फायदे, त्याचे दुष्परिणाम, याविषयी तुम्ही तुमच्या खासगी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. एखाद्याने हस्तमैथून करायचंय की नाही हा त्याचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे पण याचं योग्य ज्ञान असणं तितकंच आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *