मोनो डाएट का करावा?मोनो डाएट का करावा?

आपल्यापैकी अनेक जण डाएट करत असतील परंतु योग्य डाएटचं तुम्हाला उत्तम आरोग्य मिळवून देऊ शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? कोणताही डाएट करण्यापूर्वी तुम्ही तो डाएट करायला हवा की नाही हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. आज आपण मोनो डाएटविषयी अधिक माहिती घेणार आहोत. Mono Diet म्हणजे काय? त्याचे फायदे काय? तो नेमका कसा करायचा याची आता आपण माहिती घेऊया.

Mono Diet म्हणजे काय?

Mono Diet हा अगदी त्याच्या नावाप्रमाणे मोनो अर्थात एकावेळी एक पदार्थाने करायचा असतो. प्रत्येक मिल घेताना त्यामध्ये एकच पदार्थाचे सेवन करणे याला Mono Diet असे म्हणतात. आपण इतरवेळी जे काही पदार्थ खातो त्यामध्ये फॅट, प्रोटीन,मिनरल्स,कार्ब्स या सगळ्या घटकांचा समावेश असतो. पण Mono Diet करताना आपल्याला एकाच वर्गातील पदार्थ खाणे गरजेचे असते. उदा. जर तुम्ही डाळ घेत असाल तर केवळ डाळीचे पाणी, सूप असे घ्यावे. फळ घेत असाल तर फळांचा समावेश असावा. म्हणजे तुम्ही एकच पदार्थ खाता असे होते.

Mono Diet का करतात?

कोणताही डाएट हा शरीराचे डिटॉक्स करण्यासाठी केला जातो. ज्यावेळी तुमच्या शरीरात खूप टॉक्झिन्स जमतात. त्यावेळी तुम्हाला काही त्रास होणे सुरु होते. अशावेळी तुम्ही Mono Diet केला तर तुमच्या शरीरातून टॉक्झिन्स बाहेर पडणे फारच सोपे होते. एकच पदार्थ खाल्ल्यामुळे पचनाची क्रिया ही अधिक क्लिष्ट होत नाही. एकच पदार्थ असेल तो अगदी सहज पचतो. ज्यामुळे Bowl Movement सुरळीत होते. शरीरातून मल निघण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला हलके वाटते. त्वचा चांगली दिसते. एखादे कार्य करण्यासाठी उर्जा राहते.

Mono Diet किती दिवसांसाठी करावा?

Mono Diet करण्याचा विचार असेल तर तो तुम्ही सुरुवातील 3 दिवस करा. त्यानंतर तुम्ही हा डाएट 5 दिवसांसाठी करु शकता. हा डाएट सुरुवातीला तुम्हाला थोडा कंटाळवाणा वाटेल. पण त्यानंतर तो तुम्हाला खूपच हलके आणि फ्रेश वाटेल. त्यानंतर तुम्ही हा डाएटचा कालावधी वाढवू शकता. हा डाएट तुम्ही 21 दिवसांहून अधिक काळ करायला नको. कारण त्यानंतर शरीराला सवय होते आणि हा डाएट कोणत्याही प्रकारे काम करत नाही.

आता डाएट करताना तुम्ही याचा नक्की विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *