Veg किंवा Non-Veg खाणे हे प्रत्येकाची निवड आहे. पण आयुर्वेदानुसार काही आहार हे मानवी शरीरासाठी उत्तम म्हटले आहे. आज आपण Veg की Non-Veg काय आहे आरोग्यासाठी चांगले या बद्दल अधिक चर्चा करणार आहोत. तुम्ही Non veg खात असाल तर तुमचा आहार वाईट असे आमचे अजिबात म्हणणे नाही आणि veg खात असाल तर तुमचा आहार पुरक नाही असे देखील आमचे म्हणणे नाही. एखादा पदार्थ खाताना तो पदार्थ शरीरावर त्याचे काय परिणाम होतात. हे तुम्हाला माहीत असायला हवे.
पदार्थांची निवड
तुमचा आहार तुमच्या विहारावर परिणाम करत असतो. तुम्ही काय खाता त्यानुसार तुमचे वागणे असते असे आयुर्वेदात मानतात. जर एखादी व्यक्ती भाज्या, फळे, डाळी असा सात्विक गटात मोडणारा आहार घेत असेल तर ती व्यक्ती ही अत्यंत शांत आणि उर्जेने भरलेली असते. अशा व्यक्तिंना आरोग्याच्या कमी तक्रारी असतात. त्यांची पचनक्रिया ही उत्तम असते असे देखील अभ्यासातून दिसून आले आहे.
त्या उलट ज्या व्यक्तिंच्या आहारात मद्य, मासं असते अशा व्यक्ति शीघ्र कोपी असू शकतात. यामागे असे कारण सांगितले जाते की, असे पदार्थ खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठी लागणारी उर्जा ही त्या पदार्थांमधून मिळण्यापेक्षाही अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्ती या आळशी असतात. असे पदार्थ तामसिक गुण दर्शवतात. अशा व्यक्तिंना अनेकदा ॲसिडिटी, अपचनाच्या समस्या भेडसावत असतात.
असावा Balanced Diet
यात आम्ही तुम्ही veg किंवा Non veg खावे असा आमचा कोणताही हट्ट नाही. तुम्ही ज्या पदार्थांची निवड करता ते तुमच्या शरीराला जमत आहे की नाही त्याचा अभ्यास प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. एकावेळी अतिप्रमाणात मांस खाण्यापेक्षा ते पचण्यासाठी त्यासोबत योग्य असे फायबर खाणे देखील गरजेचे आहे हे लक्षात ठेवा. अगदी त्याचप्रमाणे व्हेज पदार्थ खाताना त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ असतील तर असे पदार्थही प्रमाणात खाणे गरजेचे आहे. कारण असे पदार्थही शरीरातील फॅट वाढवू शकतात.
त्यामुळे तुमचा आहार हा veg की Non Veg या पेक्षा किती पोषक आहे ते पाहावा.