Vaginal Health या विषयी आजही आपण खूप काही बोलायला पाहात नाही. आजही अनेक महिलांना त्यांच्या योनीची काळजी घेणे किंवा त्याबद्दल बोलणे हे क्षुल्लक वाटते. पण ज्यावेळी महिलांना UTI ( Urinary Track Infection) होते त्यावेळी याची जाणीव होते. पण तरीही याची आधीपासून काळजी घेणे हे अनेकांना फारसे काही पटत नाही. बाजारात योनीची काळजी घेण्यासाठी खास वॉश मिळतात पण त्याची काय गरज? असा विचार करुन खूप महिला ते टाळतात. तर दुसरीकडे काही जणांना याचे महत्व चांगलेच माहीत आहे. त्यामुळे ते या भागाची काळजी घेणे कधीही टाळत नाही. आज आपण Vaginal Health ची काय गरज आहे याची अधिक माहिती घेणार आहोत.
Veg की Non-Veg काय आहे आरोग्यासाठी चांगले
Vaginal Health म्हणजे काय?
महिलांच्या आरोग्यातील Vaginal Health ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. याचे आरोग्य उत्तम राहिले तर महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. महिलांच्या प्रजनन क्षमतेचे कार्य अधिक चांगले ठेवण्यासाठी मदत करत असते. जर तुम्ही या कडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अन्य काही आरोग्यविषयक समस्या या उद्भवू शकतात. महिलांना त्याच्या या खासगी जागेची काळजी असावी यासाठी हल्ली अनेक जाहिराती आणि माहितीपर लेख देखील लिहिले जातात. जेणेकरुन महिलांना मासिक पाळी किंवा अन्य काही गोष्टींमुळे याचा त्रास होऊ नये.
अशी राखा तुमचे Vaginal Health
vagina चे आरोग्य राखायचे म्हणजे फार काही खर्च येतो असा भाग नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही ही काळजी करु शकता.
- व्हजायनाचा भाग हा नियमित धुणे फार गरजेचे असते. आंघोळीच्या वेळी तुम्ही अगदी माईल्ड अशा वॉशने त्याची स्वच्छता राखायला हवी. त्यामुळे ती जागा स्वच्छ राहण्यास मदत मिळते.
- खूप जणांना शू धरुन ठेवण्याची सवय असते. ही सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक गोष्टींसाठी त्रासदायक ठरु शकते. खूप जण अस्वच्छ बाथरुमचा विचार करुन लघवीला जाणे टाळतात. त्यामुळे ज्यावेळी ते लघवीला जातात त्यावेळी त्यांना लघवीच्या जागी खूपच जळ जळ होऊ लागते. त्याचे रुपांतर मग उन्हाळे लागण्यामध्ये होते. त्यानंतर प्रत्येक लघवीला जळजळ होऊ लागते.
- लघवीला गेल्यानंतर लघवीचा जागा ही देखील स्वच्छ करायला हवी. खूप जण घाईघाईत लघवीला जातात. ते लघवीचा जागा पुसून घेत नाही. लघवीत असलेले ॲसिडचे प्रमाण हे त्या जागेवर साचून राहिल्यामुळे ती जागा अधिक गडद होते. शिवाय त्या जागेला अधिक वासही येऊ लागतो. खूप जणांना पँटीलाच नाही तर त्यांनी घातलेल्या अनेक कपड्यांना त्या ठिकाणी एक दर्प येऊ लागतो.
- मासिक पाळीच्या काळात तुम्ही काही तासांनंतर पॅड बदलणे गरजेचे असते. खूप जणांना सॅनिटरी बदलण्याचा कंटाळा असतो. पण त्यामुळे त्या ठिकाणी अधिक बॅक्टेरिया साचून राहतात. ज्यामुळे त्याचे आरोग्य बिघडते. खूप वेळा त्या जागी रॅशेश आणि खाज येऊ लागते.
- तुमच्या वरच्या कपड्यांसोबतच तुमचे आतले कपडेही तितकेच महत्वाचे असतात. योग्य फिट असलेले आणि चांगल्या कपड्याचे इनरवेअर घाला. जे तुमचे Vaginal Health चांगले ठेवण्यास मदत करतात.
आता याचे महत्व जाणून Vaginal Health ची काळजी घ्यायला अजिबात विसरु नका.