reheat food avoid

आपण सरसकट पदार्थ खात असतो पण काही पदार्थांचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतो. त्यातही असे काही पदार्थ आहेत, जे आपण पुन्हा पुन्हा गरम करून खातो. पण तुम्हाला माहीत आहे का? दैनंदिन आहारातील हे पदार्थ पुन्हा गरम खाल्ल्यास शरीरामध्ये विष निर्माण होते. क्लिनिकल डाएटिशियन गरीमा गोएलने याबाबत अधिक माहिती दिली आहे, जी या लेखातून आम्ही शेअर करत आहोत. या पदार्थांमधून मिळणारे पोषक तत्व पुन्हा गरम केल्याने नष्ट होते. इतकंच नाही तर त्याचे विष शरीरामध्ये तयार होते. कसे ते जाणून घ्या. 

काय सांगतात तज्ज्ञ

आपल्यापैकी बहुतांशी लोक हे जेवण पुन्हा गरम करून रोज खातात, मात्र जगभरातील तज्ज्ञ या प्रक्रियेला नकार देतात. क्लिनिकल डाएटिशियन गरीमा गोएलने याबाबत अधिक स्पष्टीकरण दिले आहे. काही पदार्थ हे पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील स्वाद, त्याची बनावट आणि त्यातील पोषक तत्व हे संपुष्टात येते. असे नक्की कोणते पदार्थ आहे जे पुन्हा गरम करणे टाळावे जाणून घेऊया. 

चहा कधीही पुन्हा गरम करू नका 

चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफिनोल्ससारखे यौगिक असून तुमच्या शरीराला त्याचे पुन्हा गरम करून सेवन करणे घातक ठरू शकते. चहामध्ये कॅफेन असून पुन्हा गरम करून पिण्याने सतत भीती वाटणे अथवा झोप उडणे असा दुष्परिणाम शरीरावर होताना दिसतो. तसंच तुमची पचनक्रिया बिघडून अपचनाच्या समस्या उद्भवतात. 

(वाचा – Navratri Vrat Rules: चैत्र नवरात्रीमध्ये ९ दिवस काय खावे अथवा काय खाऊ नये, पाहा संपूर्ण यादी)

पालक पुन्हा शिजवू नका 

पालक या भाजीमध्ये नायट्रेट्स असून त्याचे रूपांतर नायट्राईट्समध्ये होते. तसंच पालक पुन्हा गरम केल्यास, विटामिन सी आणि विटामिन बी सारखे सॉल्युबल फायबर नष्ट होतात.  तसंच पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. पण पुन्हा गरम केल्याने ऑक्सिजनच्या संपर्कात आयर्न येऊन त्याचा स्वाद आणि पोषक तत्व दोन्ही नष्ट होते जे शरीरासाठी घातक ठरते. 

तेलाचा पुनर्वापर टाळा 

एकदा वापरलेले तेल परत परत वापरल्यास त्याचा दर्जा घसरतोच पण त्याचा शरीरावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होतो. कुकिंग ऑईल सतत गरम करून पुन्हा थंड केल्याने आणि त्याचा अशा पद्धतीने वापर केल्याने ट्रान्सफॅट आणि एल्डिहाईडसारखे हानिकरक घटक निर्माण होतात आणि हृदयरोग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे जेवण बनविण्यासाठी एकाच वेळेत संपेल इतकेच तेल वापरा. 

(वाचा – Late Night Dinner | रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला माहीत हवेत हे नियम)

मशरूम ताजेच खा 

मशरूममध्ये असणारे छिद्र हे अत्यंत सहजरित्या हवेतील दमटपणा शोषून घेतात. त्यामुळे बॅक्टेरिया त्वरीत निर्माण होतो. मशरूम पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील बॅक्टेरिया वाढण्याचा धोका निर्माण होतो. तसंच त्याचा स्वाद आणि त्यातील पोषक तत्वदेखील मरून जातात. 

भात 

आपल्याकडे बरेच लोक भात पुन्हा पुन्हा गरम करून खातात. पण तुम्हाला माहीत आहे का? भातामध्ये बॅसिलस सेरेस नावाचा जीवाणू आढळतो. भात पुन्हा गरम केल्याने त्यातील जीवाणू हा वाढतो आणि त्याचा शरीरावर घातक परिणाम होतो. त्याचे रूपांतर विषात होते आणि यामुळे फूड पॉईजनिंगदेखील होऊ शकते. तसंच भात सतत गरम केल्यास त्याची चव जाते आणि कोरडाही होतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *