Late Night Dinner हे आता आपल्यापैकी अनेकांसाठी सर्वसाधारण झाले आहे. कारण लॉकडाऊननंतर सगळे पूर्ववत झाल्यापासून उशीरापर्यंत काम करण्याची वेळही अनेकांवर आली आहे. शिवाय आपल्याकडे असलेल्या कामांच्या वेळा यामुळेही घरी येऊन रात्री जेवताना खूप जणांना उशीर होतो. तुमचेही काम उशीरा होत असेल आणि रात्री उशिरा घरी येऊन जेवण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसेल तर आजचा विषय हा तुमच्यासाठी फारच जास्त महत्वाचा आहे. उशिरा जेवत असाल तर तुम्हाला काही नियमांचे पालन करणे हे फारच जास्त आवश्यक आहे. चला जाणून घेऊया उशीरा जेवणाचे हे बेसिक नियम
Copper Utensils | तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय मग हे एकदा नक्की वाचा
Late Night Dinner करताना

उशिरा जेवण जर आपल्यापैकी कोणालाही टाळता येण्यासारखे नसेल तर रात्री जेवताना तुम्ही काय खाताय याचे भान तुम्हाला असायला हवे. शिवाय काही नियम जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे योग्य ठरेल.
- खूप उशिरा जेवण नको याचे कारण असे असते की, तुमचा जठराग्नी हा सूर्य मावळल्यानंतर मंदावतो. त्यामुळे तुमची पचनाची क्रिया ही देखील मंदावते. त्यातच तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर त्याचा त्रास तुम्हाला दुसऱ्या दिवशी होऊ शकतो.
- उशिरा जेवत असाल तर तुम्ही कार्बोदके कमी प्रमाणात खा. कारण ते पचनासाठी जास्त वेळ घेतात. जर तुम्ही उशिरा त्यांचे सेवन केले तर तुम्हाला लवकर झोपता येणार नाही.
- पचनाची क्रिया ही 20 मिनिटांनी सुरु होत असली तरी जर तुम्ही जंकफूड खाल्ले तर ते पचणे कठीण जाते. त्यात थकव्यामुळे तुम्हाला झोप लागली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ॲसिडिटी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता किंवा पोट खराब होण्याचा त्रास होऊ शकतो.
- आपल्याला रात्री झोप येते यासाठी शरीरातील मेलाटोनिन जबाबदार असते. जर रक्तातील साखर या वेळात वाढली तर त्याचा परिणाम इन्सुलिनवर होते. त्यामुळे आपली झोप उडण्याची शक्यता असते. म्हणून शक्य असल्यास उशिरा कार्ब्स खाण्यास मनाई केली जाते.
- त्यातही शक्य असेल तर तुम्ही उशीरा एकावेळी सगळं खाण्यापेक्षा थोडं थोडं खा आणि हलके असे पदार्थ खा. उदा. यात सूप, थोडेसे सॅलेड, पोळी- भाजी असे चालू शकते. पण ते थोडं प्रमाणात खा. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.
आता रात्री उशिरा जेवताना या गोष्टींचा नक्की विचार करा.