तांब्याची भांडी वापरताना लक्षात ठेवा या गोष्टीतांब्याची भांडी वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

Copper Utensils आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर करण्याचा अनेकदा सल्ला दिला जातो. हल्लीच्या काळात किचनमधून अशी भांडी जरी गायब झाली असली तरी देखील आता पुन्हा या भांड्यांमधून पाणी पिण्याचा वापर अनेकांनी केला आहे. परंतु तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना काही गोष्टींची माहिती आपल्याला असणे फारच जास्त गरजेचे आहे. तांब्याच्या भांड्याचा वापर करताना नेमक्या कोणत्या गोष्टी माहीत हव्यात चला घेऊया जाणून

Weight Loss Mistakes | वजन कमी करताना टाळा या चुका

वाचा हे नियम Copper Utensils

१. सगळ्यात महत्वाचे तांब्याची भांडी ही जर शुद्ध तांब्यापासून बनलेली असतील तरच त्याचा वापर करावा. तांब्याच्या भांड्याचा खरा फायदा हवा असेल तर ती खरी हवी. मिश्र धातूंची नाही

२. तांब्याची भांडी स्वच्छ करणे हे फार कठीण असते. परंतु त्याची स्वच्छता फार महत्वाची असते. तांब्याची टाकी, बाटली स्वच्छ करता येत नसेल तर अशी भांडी निवडू नका.

३. तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा चिंचेचा वापर करु शकता. त्यामुळेही भांडी स्वच्छ राहतील.

४. तांब्याच्या भांड्यात खूप गरम पाणी भरु नका. कारण त्यामुळेही रिॲक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप गरम पाणी त्यात भरु नका. पाणी गरम करुन मग थंड करा

५. तांब्याचे भांड आंबट पदार्थाचा वापर करुन स्वच्छ होते. पण त्यात त्याचा साठा करणे हे अजिबात चांगले नाही. त्यामुळे यातून अजिबात कोणताही आंबट पदार्थ खाऊ नका किंवा ठेवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *