Home Plants घरी असावेत असे प्रत्येकाला वाटते. आपल्या घराला खरी शोभा ही काहीही म्हणा झाडांमुळे येत असते. झाडं असतील तर वातावरणही प्रसन्न वाटते. पण सगळ्यांनाच घरी झाडं लावता येतील असे नाही याचे कारण असे की, झाडांची काळजी हे देखील तितकेच महत्वाचे असते. खूप जणांना झाडांची काळजी घेता येणार नाही. म्हणून झाडे लावणे शक्य होत नाही. परंतु खरंच अशी काही झाडं आहेत ज्यांच्याकडे सतत लक्ष देण्याची तशी काही फारशी गरज नसते. तुम्ही अगदी आठवड्यातून एकदा पाणी घातले तरी देखील चालू शकते. चला जाणून घेऊया अशी झाडे नेमकी आहेत तरी कोणती.
मनी प्लान्ट
पैशांसाठी अत्यंत उत्तम असं मानलं जाणारं हे झाडं. घरात अगदी सहज वाढतं. त्याला फारशी काळजी घेण्याची काहीही गरज भासत नाही. कोकोपीठमध्ये तुम्ही हे झाडं लावलं की ते जडही लागत नाही. त्यामुळे ते रुममध्ये कुठेही ठेवणं शक्य होतं. पण त्याचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही योग्य दिशा पाहूनच ते झाड ठेवा. याला आठवड्यातून एकदा थोडे पाणी घाला. म्हणजे हे झाड अधिक चांगले जगेल.
जेजे प्लान्ट
पॉझिटिव्हीटी देण्यासाठी जे जे प्लान्ट हे उत्तम आहे. हे झाड घराच्या आत चांगले वाढते. असे म्हणतात या झाडातून तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळण्यास मदत मिळते. शिवाय या झाडाचा मेंटेन्संही फार कमी आहे. या झाडाची पानं सुकली की कापून टाकली तरी काम होऊन जाते. या झाडांवर किड लागण्याची कोणतीही भिती नसते. त्यामुळे यावर फार औषध फवारणी करण्याचीही आवश्यकता नसते.
बांबू पाम
इनडोअर प्लान्टमध्ये येणारे हे झाडं देखील तुम्ही घरात ठेवू शकता. तुम्हाला हे झाड कोणत्याही दुकानात मिळेल. हे झाड घरातील सुशोभीकरणासाठीही चांगले आहे. जर तुम्ही हे झाडं आणले तर त्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने या झाडाची काळजी घ्यावी लागते. आठवड्यातून एकदा पाणी आणि गरज असल्यास छाटणी केली की झाले
गोकर्णाची वेल
तुमच्याकडे छान बाल्कनी असेल तर त्यामध्ये तुम्ही गोकर्णीची वेल सोडू शकता. हे झाडं भरभर वाढते त्यामुळे तुम्हाला कापणीशिवाय फार काही काळजी घ्यावी लागत नाही. गोकर्णीच्या फुलापासून तुम्हाला चहा देखील बनवता येतो. त्यामुळे तसाही फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
तुुळशीचे रोप
हिंदू धर्मामध्ये तुळशीचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यामुळे तुम्ही घरात तुळशीचे रोप लावायला हवे. तुळशीचे अतोनात फायदे आहेत. त्याची पाने ही अनेक तब्येतीच्या कुरबुरीवर उत्तम ठरतात. याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही हे जरी खरे असले तरी देखील याला योग्य प्रमाणात उन मिळायला हवे. जर तुम्ही या झाडाचे रोपटे आणून लावले त्याला पाणी दिले त्याची योग्य काळजी घेतली तर हे झाड दिवसेंदिवस चांगले वाढते.
झाडांना खरंतरं तुमचे प्रेम हवे असते. तुम्ही त्याला प्रेम दिले तर झाड नक्की वाढते हे देखील लक्षात ठेवा