उशीरा खाणे असे ठरु शकते त्रासदायकउशीरा खाणे असे ठरु शकते त्रासदायक

Late Night Eating हा आता आपल्या कल्चरचा भाग झाला आहे. खूप जणांना रात्री उशीरा खाण्याची सवय असते. काही केल्या ही सवय जात नाही. कधीकधी तर या सवयीची इतकी जास्त सवय होते की, लवकर जेवण काही केल्या जात नाही. उलट उशीरा जेवण्याची इच्छा आणि भूक लागते. पण आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत वाईट अशी सवय आहे. आरोग्याच्या अनेक तक्रारी यामुळे सुरु होतात हे आधी आपल्याला जाणवतही नाही. परंतु त्याचे दुष्परिणाम दिसून आले की, मग ती सवय सोडणे कठीण होऊन जाते. आयुर्वेद ही तुम्हाला याबाबत काही गोष्टी सांगते. रात्री उशीरा खाणे हे का चांगले नाही या मागील कारणे, त्यासवयीमुळे होणारे त्रास… जाणून घेऊया या विषयी अधिक

मंदावते पचनक्रिया

आयुर्वेदशास्त्रानुसार आपल्या बेंबीजवळ असलेले मणिपूर चक्र हे आपल्या पचनाचे कार्य करत असते. आपला जठराग्नी हा अन्न पचवण्यास मदत करत असतो. परंतु शरीराची देखील एक क्षमता असते. पचनाचे कार्य हे दिवसा अधिक गतीने होते. त्यामुळे दिवसभरात तुम्ही कितीही खाल्ले तरी त्याचे पचन अगदी योग्यपद्धतीने होते. त्याचा शरीराला फायदा देखील होतो.परंतु सूर्य मावळल्यानंतर आपल्या पचनक्रिया या देखील मंदावलेल्या असतात. कोणताही जड पदार्थ खाल्ला तरी तो पटकन पचत नाही. अर्थात अशा जड खाण्यामुळे आपल्याला ॲसिडिटी, सतत ढेकर येणे किंवा मळमळणे असे त्रास होऊ लागतात. त्यामुळे सूर्य मावळण्याच्या आत तुम्ही खायला हवे. आताच्या काळात हे शक्य नाही. परंतु शक्य असेल तितके हलके फुलके पदार्थ हे तुम्ही लवकरात लवकर खायला हवे.

Bad Office Habbit | ऑफिसमधल्या या चुकीच्या सवयी ठरु शकतात त्रासदायक

उशीरा खाणे कसे बाधते

तुम्ही झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवणे फारच गरजेचे आहे. जर तुम्ही उशीरा खात असाल तर तुमची स्लीप सायकल ही देखील तितकीच चुकीची असू शकते. कारण खाल्ल्यानंतर तुम्हाला झोप येणे शक्यच नाही. त्यामुळे जागरण होते. त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते. पोट सतत जड वाटू लागते. पोट साफ होत नाही. वजन वाढते या शिवाय पिंपल्स येणे, हार्मोन्सचे संतुलन बिघडणे असे सतत होत राहते.

तुम्हालाही सतत बाहेरचे आणि उशीरा जेवायची सवय असेल आणि हे त्रास होत असतील तर आजच स्वत:ला शिस्त लावा. जेवणाची वेळ पाळा. आरोग्य राखा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *