TMKOC ही आजही अनेकांच्या आवडीची मालिका आहे. सगळ्यांना खळखळून हसवायला लावणारी ही मालिका आणि मालिकेतील कलाकारही अनेकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनदकत आणि बबिता ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्त यांच्या संदर्भातील एक बातमी संपूर्ण सोशल मीडियावर वायरल झाली. या बातमीने अनेकांना बोट ताोंडात घालण्याची वेळ आली. कारण ही बातमी या दोघांच्या साखरपुड्याची होती. त्यांच्या अफेअर्ससंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यावेळी या कलाकारांनी याकडे दुर्लक्ष केले. पण एका प्रसिद्ध मीडिया हाऊसने त्यांच्या साखरपुड्याची बातमी दिल्यानंतर मात्र या अभिनेत्याला मौन सोडावे लागले. त्याने याचा खुलासा करणारी स्टोरी पोस्ट केली.
Dolly Chai wala ची प्रसिद्धी अधिक वाढली,सोशल मीडियावरुन
ही फक्त अफवा TMKOC
राज अनदकत आणि मुनमुन दत्त यांचे अफेअर असल्याचे कायमच चर्चेत होते. हे दोघं सेटवर एकमेंकाच्या प्रेमात पडले असे देखील सांगण्यात येत होते. परंतु यावर त्यांनी कधीही उघडउघड भाष्य केले नाही. जी गोष्ट नाही ती गोष्ट का सांगावी असा पवित्रा त्यांनी घेतला होता. पण ही गोष्ट बोलणे त्यांना भाग पडले ज्यावेळी त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीने गोंधळ घातला. घरगुती सोहळ्यात या दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यावेळी या कलाकारांनी ती बातमी काय होती? हे न टाकता तुम्ही जे काही ऐकताय किंवा वाचताय त्यात काहीही सत्य नाही. ही केवळ एक अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या आयुष्यात व्यग्र

राज आणि मुनमुन हे सहकलाकार असले तरी देखील ते आपल्या आयुष्यात व्यग्र आहेत. राजने ही मालिका कधीच सोडली असून आता त्याचा या मालिकेशी कोणताही संबंध नाही. तो सध्या ट्रॅव्हल आणि काही वेगवेगळ्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर मुनमुन अजून या मालिकेचा भाग असून ती शूट आणि आपली इतर कामंही चांगली एन्जॉय करते. आता राहिला प्रश्न मालिकेचा तर मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडली त्यामागेही अनेक कारणं आहेत. या मालिकेच्या सेटवर अनेकांचे शोषण होते असे निदर्शनास आले आहे. TMKOC
दरम्यान त्यांच्या साखऱपुड्याची बातमी ही साफ खोटी आहे हे मात्र नक्की !