Elvish Yadav सापाचे विष पार्टीसाठी मागवल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या आई वडिलांकडे या संदर्भातील चौकशी सुरु आहे. त्यांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचे सांगितले असले तरी देखील एल्विशने गुन्हा कबूल केल्यामुळे त्याला नोएडा पोलिसांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. परंतु आता पोलिसांनी त्याच्यावर लावलेल्या आरोपामध्ये ड्रग्ज संदर्भातील काही ठपका ठेवला होता. पण तो नजरचुकीने झाल्याचे सांगत तो गुन्हा आता त्यातून काढण्यात आला आहे.
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने झाली अटक

Elvish Yadav ने दिल्लीतील एका पार्टीमध्ये सापांचे विष नशेसाठी मागवले आहे असा आरोप होता. पण या आरोपाचे खंडन करत त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. परंतु त्यानंतरही या विष मागवल्याप्रकरणी पोलिसांचा ससेमिरा काही सुटला नव्हता. पोलिसांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याने त्यावर समाधानकारक उत्तर दिली आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार त्याने त्याचा गुन्हा कबुल केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता पोलिसांनी केलेल्या चुकीमुळे तरी त्याला आता जामीन मिळेल अशी आशा अनेकांना आहे.
Elvish Yadav आहे कोण?
एल्विश यादव हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून त्याचे युट्युबवर अनेक चाहते आहे. बिग बॉस ओटीटी 2 च्या सीझनचा तो विजेता आहे. त्यानंतर त्याची प्रसिद्धी काय आहे ते सगळ्यांच्या लक्षात आले होते. तो अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. त्याच्या पाठीमागे एक खूप मोठा फॅनबेस आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष सापडले होते. हे विष नशा करण्यासाठी वापरले जात होते.असे निदर्शनास आल्यानंतर इल्विश आणि त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली.
आता त्याच्या फॅनना प्रतिक्षा आहे ती त्याला जामीन मिळण्याची