Dolly Chai wala कोण? हे आता आपल्या कोणालाही सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचली आहे आणि आता बिल गेट्स (Bill Gates) मुळे तर तो परदेशातलही प्रसिद्ध झाला आहे. त्याची ही प्रसिद्धी पाहता आता त्याच्या टपरीवर अधिक गर्दी होऊ लागली आहे. सोशल मीडियावर त्याच्यासोबत अनेक जण फोटो पोस्ट करु लागले आहेत.
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
एका रात्रीत झाला स्टार…. पण Dolly Chai wala

डॉली चायवाला हा अनेकांना एका रात्रीत स्टार झाला असे वाटत असेल तर असे मुळीच नाही. त्याची टपरी आणि त्याची चहा बनवण्याची स्टाईल ही आजही तशीच आहे. नागपूरमध्ये असलेली त्याची ही चहाची टपरी त्याच्या चहासोबत त्याच्या चहा बनवण्याच्या स्टाईलमुळे आधीच प्रसिद्ध आहे. बारीक अंगाचा, केस रंगवलेला, डोळ्यावर मोठा गॉगल आणि चहा बनवण्याची हटके अदा त्याला इतरांपेक्षा नक्कीच वेगळी बनवते. त्याचे व्हिडिओ हे या आधीही काही फूड ब्लॉगरने केलेले आहेत. परंतु एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे ओढून घेतले. हा व्हिडिओ अन्य कोणी नसून मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचा होता. भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी डॉलीच्या टपरीला भेट दिली. त्यावेळी त्यालाही काही माहीत नव्हते. त्याने त्याच्या स्टाईलने चहा बनवला आणि तो व्हिडिओ सुपर डुपर वायरल झाला. त्यामागे हा एक व्हिडिओ नाही तर त्याची मेहनत आहे.
परदेशी पर्यटक वाढले
डॉलीसोबत व्हिडिओ करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आता अनेक पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. अनेक जण या ठिकाणी रिल काढण्यासाठी येतात. चलो आता एक म्हणावे लागेल की, डॉली की तो निकल पडी
आता डॉलीसोबत आणखी कोणाचा व्हिडिओ येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.