स्किन केअर टिप्स

अनेक जणांना चेहरा गरम पाण्याने धुवायची सवय असते. आंघोळ करताना तर चेहरा गरम पाण्यानेच धुतात पण फेसवॉशच्या वेळीही अनेक जण गरम पाण्याने चेहरा धुतात. पण नियमित तुम्ही गरम पाण्याचा वापर हा चेहरा धुण्यासाठी करणे योग्य आहे का? यामुळे तुमची त्वचा अधिक डॅमेज होऊ शकते आणि तुम्हाला त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गरम पाण्याने चेहरा धुण्याचे काय दुष्परिणाम आहेत याबाबत ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे, ती जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – iStock)

नैसर्गिक तेल जाते 

गरम पाणी हे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेल संपुष्टात आणते. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ लागते आणि याशिवाय एक्झिमा अथवा सोरायसिससारख्या समस्या तुम्हाला त्रासदायक ठरतात. याशिवाय तुमची त्वचा अधिकाधिक कोरडी होते आणि त्वचेच्या रोगांना निमंत्रण मिळते. 

(वाचा – ४५ च्या पार होईल उष्णतेचा पारा! Heat Stroke पासून वाचण्यासाठी करा ५ सोपे उपाय)

त्वचेचे इन्फेक्शन 

सतत गरम पाण्याने चेहरा धुत राहिल्यास स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे त्वचेवर जळजळ निर्माण होऊ शकते. गरम पाण्याने चेहरा धुत असल्यास, त्वचेवर लाली येणे, खाज येणे आणि कोरडेपणामुळे त्वचेवर पापुद्रे निर्माण होणे या समस्याही तुम्हाला जाणवू शकतात. तसंच ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील आहे, त्यांना अनेक त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

रक्तप्रवाहाचा त्रास 

ससत गरम पाण्याने चेहरा धुताना तात्पुरते बरे वाटत असले तरीही तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह यामुळे वाढतो आणि त्याचा परिणाम मुरूमं येणे आणि अन्य सुजलेल्या त्वचेची परिस्थिती खराब करण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा. 

त्वचा फाटणे 

जास्त वेळ गरम पाण्याच्या संपर्कात राहिल्याने त्वचेमध्ये लहान ब्लड सर्क्युलेशन पसरते आणि यामुळे त्वचा फाटू शकते. तसंच सेल्स तुटतात आणि आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची अथवा पिगमेंटेशनची शक्यता निर्माण होते. तुमच्या चेहऱ्याचा असलेला रंग यामुळे उडू शकतो आणि गोऱ्या चेहऱ्यावर काळे डाग येऊन चेहरा खराब होऊ शकतो. 

सुरकुत्या पडणे 

सतत गरम पाण्याने फेसवॉश केल्याने वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात. तसंच तुम्ही वयस्कर दिसू शकता आणि फाईन लाईन्स दिसल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर म्हातारपण लगेच दिसू शकते. त्यामुळे चेहरा धुताना थंड पाण्याचाच वापर करावा. 

(टीप – या लेखात दिलेली सर्व माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर असून Marathi News Flash कोणताही दावा करत नाही. कोणत्याही गोष्टी वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *