एप्रिल महिना चालू नाही तोवर उष्णतेचा पारा कमालीचा वाढलेला दिसून येतोय. पण तुम्ही या गर्मीमध्ये स्वतःचे शरीर कसे बरं थंड ठेऊ शकता? सध्या हीट स्ट्रोकची स्थिती उद्भवलेल्याचे दिसून येत आहे. Mayo Clinic नुसार हिट स्ट्रोक तेव्हाच होते जेव्हा शरीराचे तापमान हे १०४ डिग्री फॉरेनहाईट अथवा ४० डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक होते.
तुम्ही जेव्हा जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी करता अथवा अधिक काळ उष्ण तापमानामध्ये राहता तेव्हा शरीर आतून खूपच गरम होते आणि त्याला हिट स्ट्रोक असं म्हटलं जातं. यावर वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही नक्कीच हिट स्ट्रोकपासून वाचू शकता. जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
पाण्याची कमतरता जाणवू देऊ नका

हीट स्ट्रोक थांबविण्यासाठी तुम्ही रोज दिवसातून २-३ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातून पाणी कमी होणार नाही. पाण्याची शरीरामध्ये कमतरता असेल तर हिट स्ट्रोकचा धोका अधिक बळावतो.
अल्कोहोलचे सेवन नका करू
अल्कोहोल अथवा कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन अशावेळी करू नका. उन्हाळ्याच्या दिवसात अल्कोहोल वा कॅफीन सेवन केल्यास शरीर लवकर तापते आणि तुम्ही उन्हाच्या संपर्कात आल्यास त्याचा तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो.
उन्हापासून स्वतःला वाचवा
जास्त काळ उन्हात राहण्याने हिट स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्ही जर उन्हात जाणार असाल तर टोपी घाला, गॉगल लावा तसंच त्वचेला सनस्क्रिन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सावली असेल तिथूनच चालण्याचा प्रयत्न करा. पाणी पित राहा.
थंड पदार्थ खा

उन्हात काम करताना तुम्ही शरीराला थंडावा मिळेल असेच पदार्थ खा. आंब्याचे पन्हे, नारळाचे पाणी, ताक, दही यासारख्या पदार्थांचा शरीरामध्ये समावेश होऊ द्या. नारळाच्या पाण्यातील इलेक्ट्रोलाईट्स शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
हलके डाएट
उन्हाळ्यात ताजी फळं, कलिंगड अथवा भाज्यांचे अधिक सेवन करा. ज्या पदार्थांमध्ये पाण्याचा अधिक समावेश असेल उदा. काकडी, टरबूज, पपई, कारलं, दुधी हे पदार्थ खा. यामुळे हिट स्ट्रोकचा धोका कमी होईल.
टीपः हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.