‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहचलेल्या, आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना आपलंसं करणाऱ्या दोन गोड अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदालकर आणि शिवाली परब. शिवाली आणि भिवाली या पात्राने तर दोघींनी दणाणून सोडलं आहे. या दोघीही कमालीच्या अदाकारा तर आहेतच पण त्यांची फॅशनही तरूणाईला भुरळ पाडताना दिसते. शिवाली आणि प्रियदर्शिनी दोघीही नेहमीच आपल्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदी करत असतात.
नुकताच कॉटनच्या साड्यांमधील या दोघींचा लुक व्हायरल होताना दिसून येत आहे. उन्हाळा सुरू झालाय आणि तुम्हाला साड्यांची फॅशन वा स्टाईल कशी करायची हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या दोघींच्या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता.
शिवालीचा लुक

शिवालीने मरून रंगाची कॉटन साडी नेसली असून यासह त्याच रंगाचा सिंगलेट ब्लाऊज मॅच केलाय. तर केसांना मधून भांग पाडत तिने कर्ल काढले आहेत आणि आंबाडा बांधून त्यात गजरा माळला आहे. ऑक्सिडाईज्ड चोकर, कानातले, अंगठी आणि बांगडी घालत तिने या साडीवर स्टाईल केली आहे. कपाळावर छोटीशी टिकली लावत मराठमोळा टच दिला असून या साडीला मॅच होईल असा मॅट मेकअप केलाय. डार्क मरून रंगाची लिपस्टिक लावत हा लुक पूर्ण केलाय.
(वाचा – Haldi kumkum Ideas| यंदा हळदीकुंकवाला द्या हटके वाण)
प्रियदर्शिनीचा इंडिगो लुक

इंडिगो साड्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही आणि उन्हाळ्यात तर अशा साड्या अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात. प्रियदर्शिनीने इंडिगो निळी कॉटन साडी नेसली असून यासह तिने डीपनेक बॅकलेस ब्लॅक ब्लाऊज मॅच केलाय. तिचा हा बोल्ड आणि ब्युटीफुल लुक कमालीचा आकर्षक दिसतोय. यासह तिनेदेखील आपल्या कुरळ्या केसांचा आंबाडा बांधत गजरा माळला आहे. तर ऑक्सिडाईज्ड कानातील कुड्या, गळ्यात ठुशी आणि बांगड्या, नथ असे अलंकार घातलेत. याशिवाय कपाळावर लहानशी काळी टिकली, गालावर खळी आणि सोबर मेकअपने चाहत्यांच्या काळजाचा ठावच घेतलाय.
समर लुक स्पेशल

तुम्हालाही उन्हाळ्यात एखाद्या कार्यक्रमात जाण्यासाठी जर कम्फर्टेबल लुक करायचा असेल तर प्रियदर्शिनी आणि शिवालीच्या या लुकवरून तुम्हाला प्रेरणा घेता येईल. कॉटनच्या साड्या या अंगाला परफेक्ट बसतात आणि घामाचाही या साड्यांमध्ये त्रास होत नाही. तसंच दिसायला रिच आणि रॉयल असणाऱ्या या साड्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.
(फोटो सौजन्य – @shini_da_priya Instagram)