serial kisser इम्रानची लव्हस्टोरीserial kisser इम्रानची लव्हस्टोरी

Serial kisser ही त्याची ओळख बनली. त्याच्या त्याच बिनधास्तपणामुळे त्याला चांगलेच फेम मिळाले. त्याने काम केलेल्या प्रत्येक अभिनेत्रीसोबत त्याने ऑनस्क्रिन किस केले आहे. एक काळ असा होता की, इम्रान हाश्मीची नशा सगळ्यांवर होती. स्क्रिनवर इतक्या बिनधास्त रोमांस करणारा इम्रान हाश्मी अनेकांना आवडायचा तर तो काहींच्या टीकेचा सुद्धा धनी बनला. पण तो मागे कधीच हटला नाही. त्याने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. स्क्रिनवर तो कितीही हॉट रोमाँस करताना दिसला तरी सुद्धा ऑफस्क्रिन तो एक परफेक्ट नवरा आणि उत्तम बाप आहे. त्याची Behind The Camera लव्हस्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत.

Dawood- Mandakini Love story

तरुणपणातच झालं परवीनसोबत प्रेम… पूर्ण केलं वचन

मिळालेल्या माहितीनुसार खूप आधीपासून इम्रान आणि परवीन एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात तेव्हापासूनच प्रेम सुरु होते. परंतु दोघांनाही करिअर महत्वाचे होते. करिअरच्या वयात आपण उत्तम सेटल होऊन मग लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. त्याने लग्नाआधी कधीही कोणत्याही मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी जीवनाचा उलगडा केला नाही. परंतु त्याने कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट केल्याची देखील चर्चा कुठेही झाली नाही. कारण त्याने परवीनसोबत आयुष्य घालवण्याचे जे वचन दिलेले होते. इम्रान हा महेश भट यांच्या नात्यातील आहे. त्याने ‘राज’ या चित्रपटावेळी असिस्टंट म्हणून काम केले आहे. तेथूनच त्याला पुढे मर्डर या चित्रपटात मुख्य रोल भट यांनी दिला. या चित्रपटातील त्याचा रोमाँस आणि किस याने हा चित्रपट तब्बल 100 दिवस थिएटरमध्ये चालला. एका चित्रपटाने त्याला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करुन नाव कमावले. पण आपल्या लेडी लकला तो कधीच विसरला नाही. त्याने नाव कमावल्यानंतर 2006 साली अत्यंत साध्या अशा सोहळ्यात परवीनसोबत लग्न केले.

Serial Kisser चा नाही झाला नात्यावर परिणाम

प्रेमाचे नाते जुळायला वेळ लागत नाही तसे ते तुटायलाही वेळ लागत नाही. विशेषत: बॉलिवूडमध्ये असे ब्रेकअप्स सुरु असतात. शिवाय इतर अभिनेत्रींसोबत रोमाँस करताना कधीकधी एखादी व्यक्ती आपले प्रेम विसरुन जाते. ज्याचा परिणाम या ब्रेकअप्स होतात. पण ऑनस्क्रिन त्याने कितीही किस केल्या तरी तो परवीनसोबत कायम खरा राहिला. त्याच्या ज्यावेळी विचारले जायचे की,तू ऑनस्क्रिन किस करतोस हे तुझे बायको कसे हँडल करते? त्यावेळी त्याने मजेशीर किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की, पूर्वी मी ज्यावेळी असे सीन करायचो त्यावेळी माझी बायको उशीने मारायची. पण तिने कधीही त्यावर भांडण केले नाही. आता तो मार फटक्यावर आला आहे. पण मीच किसिंग सीन बंद करुन टाकले आहे. पुढे तो म्हणाला की, मी ज्या ज्यावेळी कोणा इतराला किस करायचो त्यावेळी मी परवीनला बॅग गिफ्ट करायचो. त्या बॅग इतक्या झाल्या आहेत की, आमच्यकडे परवीनच्या बॅग्जनी भरलेले एक कपाट आहे.

ऑफस्क्रिन नाही रोमाँटिक

तो म्हणतो की, मला लोकांनी स्क्रिनवर इतका रोमांस करताना पाहिले आहे. पण मी खऱ्या आयुष्यात अजिबात तसा नाही. मी कधीही माझे प्रेम अशा पद्धतीने परवीनलादेखील दाखवलेले मला आठवत नाही. परवीनने मला कधीच यासाठी विरोध केला नाही. तिने कोणतेही नियम माझ्यावर लादले नाहीत. मी तिला कोणतेही महागडे गिफ्ट दिले आहे असे मला आठवत नाही. शिवाय तिनेही त्याची मागणी माझ्याकडे केलेली नाही.

मुलाभोवती फिरते दुनिया

इम्रान -परवीनला एक मुलगा आहे. त्याचे नाव अयान असे आहे. अयान जेव्हा 4 वर्षांचा होता त्यावेळी त्याला एक विशिष्ट कॅन्सर झाला. त्यानंतर इम्रान- परवीनचे आयुष्य पूर्णपणे हलून गेले. आपल्या मुलासाठी त्याने अनेक देश पालथे घातले. त्याच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी तो परदेशात असायचा. काम आणि मुलाची ट्रिटमेंट असे सगळे काही त्याने केले. पण त्याने याबद्दल कोणत्याही मीडियाला कधीही काही सांगितले नाही. मुलाला कॅन्सरमुक्त केल्यानंतरच तो शांत झाला. त्याचा अयान आता एकदम फिट असून त्याच्याभोवती या दोघांची दुनिया फिरते

कॉन्ट्राव्हर्सीपासून असतो कोसो लांब

इतक्या अभिनेत्रींसोबत रोमाँस करुनही कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सीमध्ये इम्रान हाश्मी अडकला नाही. तो पार्टीजमध्ये फारच कमी दिसतो. इतकेच काय त्याची बायकोही फारच क्वचित ठिकाणी दिसते. त्यामुळे ते लाईमलाईट पासून दूर राहताना दिसतात. आता इम्रान असे कोणतेही रोल करत नाही. त्याने आपल्या अभिनयाची लकब बदलली आहे. आता अधिक दृढ आणि चांगल्या भूमिका करताना दिसतो.

अशी आहे सर्वसामान्य अशी इम्रान- परवीनची लव्हस्टोरी पण तरीही तितकीच वेगळी आणि सुंदर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *