Raha Kapoor ला पाहिल्यांदा पाहिल्यापासून अनेकांच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. आता कोणताही स्टार किड पाहिल्यानंतर भारतात अशा प्रतिक्रिया उमटणे हे अगदी साहजिक आहे. आलिया- रणबीर कपूरची लेक पाहण्यासाठी सगळा सोशल मीडिया उत्सुक होता. अखेर ख्रिसमस पार्टीचे निमित्त साधत आलिया- रणबीरने राहाचा चेहरा सगळ्यांना दाखवला. अगदी थोड्याच वेळासाठी तिला अनेकांनी पाहिले असले तरी सगळ्या सोशल मीडियावर सध्या तिच्यावरच चर्चा होताना दिसत आहे. राहा कोणासारखी दिसते? ती कोणाची लेगसी चालवेल? असे बरेच काही चर्चिले जात आहे. दरम्यान आलियाच राहाबद्दल काय म्हणाली होती ते देखील जाणून घेऊया.
राहा आजोबांसारखी दिसते

आलिया-रणबीरला कन्यारत्न झाले त्यानंतर तिला पाहण्यासाठी खूप जण उत्सुक होती. परंतु आलियाने तिचा चेहरा मीडियासमोर अजिबात आणला नव्हता. ती कशी दिसते याबद्दलही कुठेच काही चर्चा केलेली ऐकली नव्हती. परंतु यंदा नव्या सीझनच्या कॉफी विथ करणमध्ये आलिया- करिना या दोघी आल्या होत्या. त्यावेळी आलियाने राहाचा विषय काढला. करिना म्हणाली,’ राहा ही तिच्या वडिलांसारखी म्हणजेच रणबीरसारखी दिसते. त्यावेळी आलिया म्हणाली की, ती तिच्या आजोबांवर गेली आहे. ती राज कपूर यांसारखी दिसते.
काय म्हणतात नेटीझन्स
तर नेटीझन्सने देखील राहावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ती संपूर्णपणे कपूर परिवारावर गेली आहे. तिचे निळे डोळे हे अगदी लहानपणी जसे करिनाचे होते तसे आहे. इतकेच काय तर ती रणधीर कपूर, राज कपूर यांच्यासारखी दिसते. तिची संपूर्ण ठेवण देखील लहानपणीच्या करिनासारखी आहे. त्यामुळे ती मोठी होऊन तितकीच सुंदर दिसेल यात कोणतीही शंका नाही.
दरम्यान, अचानक राहाला असे दाखवणे हे सगळ्या मीडियासाठी नक्कीच एक खास खबर होती यात शंका नाही.