मुंबईः रविवारी भल्या पहाटे अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर बेछूट गोळीबार करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली आहे. सलमानला गेले अनेक वर्ष लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या येत असून त्याच्यावर हल्लेही झाले आहेत. पुन्हा एकदा याची प्रचिती १४ एप्रिल रोजी सकाळी आली.
टाईट सिक्युरीटीनंतरही घडली घटना
रविवारी सकाळी ४.५५ च्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी सलमान खानच्या घरावर बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे सलमानचे पूर्ण कुटुंबीय चिंतेत असल्याचे दिसून आले. इतक्या टाईट सिक्युरीटीनंतरही मुंबईच्या बांद्रा विभागात ही घटना नेमकी घडलीच कशी याचा शोध घेण्यासाठी १५ जणांची टीम तैनात करण्यात आली असून आता रोहीत गोदारा हे नाव समोर आलंय.
(वाचा – Arvind Kejriwal | जेलमधील पहिली रात्र होती अस्वस्थ करणारी, केजरीवाल यांना या कारणासाठी झाली अटक)
कोण आहे रोहीत गोदारा?
रोहीत गोदारा हा जेलमध्ये सध्या असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा अत्यंत जवळचा सहकारी आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या अहवालानुसार, UK मधून तो सर्व काम सांभाळतो. NIA गेल्या काही वर्षापासून त्याच्या मागावर असून त्याला भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहे. मूळचा राजस्थानमधील बिकानेर येथील रहिवासी असणाऱ्या रोहीत गोदारावर ३५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून त्यामध्ये हत्या आणि खंडणीवसुलीचा समावेश आहे. बनावट पासपोर्ट तयार करून दुबईमार्गे तो लंडनला गेल्याचे सांगण्यात येते. सिद्धू मुसेवाला प्रकरणातही त्याचा हात असल्याचे समोर आले आहे.
(वाचा – Ujjain Mahakal | भस्मारतीच्या वेळी भडकली आग, पुजाऱ्यासह 13 जखमी)
CCTV फुटेज आले समोर
सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांचे फोटो मिळाले असून दोघेही फरार झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान अनमोल बिश्नोईने या हल्ल्याची ऑनलाईन पोस्टद्वारे कथित जबाबदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजूनही सलमान खानवर नक्की हल्ला कोणी केला याबाबत सर्वच गोंधळ आहे. ईदनंतर त्वरीतच ही घटना घडली असून अनेक मान्यवरांनी सलमानच्या घरी जाऊन त्याला भेट दिली आहे.