Ujjain Mahakal च्या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. येथील भस्मारती ही पाहण्यासाठी मध्यरात्रीपासून लोकांच्या रांगा लागतात. या ठिकाणी कधीही कोणताही अनुचित प्रकार घडून आला नाही. परंतु कोणाच्याही ध्यानी मनी नसताना या मंदिरात भस्मारतीच्या वेळी आग लागण्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर या आगीच 13 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीत सगळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
25 मार्चच्या दिवशी रंगपंचमीच्या निमित्ताने अनेक भाविक या मंदिरात महाकालच्या भेटीसाठी आले होते. भस्मारतीची सुरुवात होताच अचानक पुजाऱ्याच्या हातात असलेल्या आरतीचा भडका उडाला आणि आग वाढत गेली. गर्भगृहात ही आग लागल्यामुळे आतल्या आत ही आग राहिली. आतापर्यंत अशी घटना कधीच या ठिकाणी झाली नाही. परंतु लोकांनी दिलेल्या माहितीनुसार भस्मारतीच्या वेळी कोणीतरी गाभाऱ्यात गुलाल उधळला. हा गुलाल आरतीच्या ताटात गेल्यामुळे त्यातील रसायनाने पेट घेतला. येथील गर्भगृह चांदीने लेपण्यात आलेले आहे. या ठिकाणी गुलाल उधळू नये असे सांगणारे बोर्डही या आगीत जळून भस्म झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गुलालामुळे या आगीचा भडका उडाला. यात सगळे किरकोळ जखमी झाले तरीही अनेकांच्या मनात या आगीची भिती निर्माण झाली आहे.
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले मध्यप्रदेशातील हे मंदिर अनेक भाविंकांसाठी आकर्षण आहे. असे असताना येथे अशी घटना घडल्यामुळे आता मंदिर परिसरात अधिक खबरदारी घेतली जात आहे.