Mangal Prabhat Lodhaजरीमरी, साकीनाका परिसरात असलेल्या एक गुंडाकडून हिंदू कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा या गुंडाकडून प्रयत्न होत होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पालकमंत्री यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाची चौकशी केली शिवाय या गुंड्याचे अनधिकृत उभारलेले 5 मजली घरही तोडण्याचे निर्देश दिले. यानुसार महापालिकेकडून ही कारवाई सुरु झाली असून केवळ या घराचा तळमजला ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
या भागात स्थानिक हिंदू कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भिंतीला लागूनच अतिक्रमण करत 5 मजली अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यालगत असलेल्या मंदिरात नित्यनियमाने पूजा करणाऱ्या हिंदू नागरिकांना या गुंडाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जबरदस्ती त्रास दिला जात होता. स्थानिक नागरिकांनी तब्बल 40 तक्रारी दाखल करून सुद्धा पोलीस या घटनेकडे कानाडोळा करत होते. दिनांक 14 मार्च रोजी या गुंडाने सूड घेण्याच्या भावनेने त्याच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या हिंदू नागरिकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. Mangal Prabhat Lodha

यावेळी लोढा म्हणाले की, ‘जरीमरी येथील घटनेचा आढावा घेऊन लक्षात आले की, येथेही हिंदूंना त्रास देऊन प्रताडित करण्याचे मालवणी पॅटर्न सुरू आहेत! हे बंद झाले पाहिजे! यासाठी योग्य ती कारवाई करू! येथील भूमीपुत्रांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.”