Indian Student Killed In US परदेशात शिकण्याचे स्वप्न अनेकांचे असते. आपले अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जातात. त्यात अमेरिका ही अनेकांचे स्वप्न असते. आपल्या देशातील अनेक विद्यार्थी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. परंतु भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचारांच्या अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आता आणखी एक घटना घडली आहे त्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये ही घटना घडली असून अभिजीत पुरुचुरु असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट Indian Student Killed In US

अभिजीत पुरुचुरु हा बोस्टन येथे शिकण्यास होता. त्याचे कुटुंबही अमेरिकेत राहात होते. केनिडीकट येथील परिसरात त्यांचे वास्तव्य होते. त्याचे शव याच परिसरातील एका जंगलामध्ये आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. त्याचे शव जंगलात खूप आत एका गाडीमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. युनिव्हर्सिटीनुसार त्याचे काही विद्यार्थ्यांसोबत मतभेद झाले होते. आता त्यातून ही हत्या झाली का याचा तपास केला जात आहे.
भयानक हल्ले काळजीत टाकणारे
पूर्वी पासूनच भारतीयांवर अमेरिकेत हल्ले होत आहे. 2024 पासून तर यात अधिक भर पडली आहे. केवळ तीन महिन्यांमध्ये 6 हून अधिकांचा यामध्ये बळी गेला आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये विविध वयांच्या भारतीय नागरिकांना मारण्यात आले आहे. अमेरिकेत भारतीय लोकांच्या वस्ती आहेत. या परिसरातच जास्तीत जास्त भारतीय राहतात. परंतु असे होणारे हल्ले पाहता येथील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
या घटनेने अमेरिकेतील भारतीयांनी भीती व्यक्त केली आहे.