केजरीवाल यांची तिहारमधील पहिली रात्र अस्वस्थकेजरीवाल यांची तिहारमधील पहिली रात्र अस्वस्थ

Arvind Kejriwal हे सध्या आशियातील सगळ्यात मोठ्या कारागृहात अर्थात तिहार जेलमध्ये आहेत. तिहारमधील त्यांची पहिली रात्र ही अत्यंत अस्वस्थ गेल्याची माहिती मिळत आहेत. त्यांच्यावर अत्यंत कडक असा पहारा ठेवण्यात आला आहे. शिवाय त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्यावर सतत उपचार देखील सुरु असल्याचे कळत आहे. विशेष म्हणजे, ते देशाचे असे पहिले मुख्यमंत्री आहेत जे पदावर असताना तुरुंगात आहेत. दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेनंतर तुरुंगात काय काय घडले याची माहिती देखील तुरुंग अधिकाऱ्यांनी विस्तृत असे सांगितले आहे.

केजरीवाल यांना दारु घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंग करण्याप्रकरणी 21 मार्च रोजी अटक करण्यात आलेली आहे. काल त्यांची तिहार तुरुगांत पहिली रात्र होती. परंतु त्यांना या पहिल्याच दिवशी फार अस्वस्थ झाले आहे. ते उशिरापर्यंत झोपले नव्हते.फेऱ्या मारत होते, शिवाय त्यांची शुगरही कमी झाल्याचे वैद्यकीय तपासणीच्यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना घरचे जेवण देण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबातील पत्नी आणि मुलीला भेटण्याची परवानगीही देण्यात आलेली आहे.

Rahul Gandhi | काँग्रेसची खाती गोठवण्यावर राहुल गांधी यांनी व्यक्त केला संताप

शिवाय त्यांच्या सेलबाहेर पोलीस आणि डॉक्टर असून ते त्यांच्यावर सतत नजर ठेवत असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. 14 दिवसांची चौकशी केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर कोणतेही दोष सिद्ध झालेले नसताना त्यांना अटक का करण्यात आली असा सवाल त्यांच्या विद्यमान पत्नी यांनी करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *