Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला आता सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांची विविध पक्षात इनकमिंग -आऊटगोईंग सुरु आहे. अनेक नेत्यांनी आपला मूळ पक्ष सोडून भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केला आहे. पण आता भाजप खासदार उन्मेश पाटील यांच्या शिवसेना (UBT) प्रवेशावर चर्चा सुरु झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीचा अर्थ हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील प्रवेश असा मानला जात आहे.
Loksabha 2024 | भाजप- मनसेची युती अडली कुठे, चर्चांना उधाण
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा होत असताना संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, उन्मेश पाटील (Unmesh Patil) हे भाजपवर नाराज आहेत, त्यांनी केवळ आम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून ते पक्षात प्रवेश करणार की नाही याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. परंतु नाराजी या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, जळगाव जिल्ह्यातून भाजपने स्मिता वाघ यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे तिकीट कापले गेले आहे. याचा राग त्यांना असणे देखील स्वाभाविक आहे.
परंतु या भेटीचा अर्थ भाजप सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जायचे असा होतो की नाही या निष्कर्षावर येण्यासाठी थोडे थांबावे लागेल.