Loksabha 2024 च्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिल्ली गाठली होती. दिल्लीत जाऊन त्यांनी अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर महायुतीसोबत मनसे असल्याचे सांगितले जात होते. त्यांच्या 2 जागांसाठीची बोलणी देखील सुरु असल्याचे कळत होते. परंतु अद्याप महायुती जाहीर न केल्यामुळे आता काहीतरी गंडलंय असं म्हणायची वेळ आली आहे. पण नेमकं हे सगळं अडलं कुठे? याची आता चर्चा होऊ लागली आहे
MNS | महायुतीकडून मनसेची 3 जागांची मागणी, महायुतीकडून प्रयत्न सुरु

सध्या महायुतीमध्ये असलेल्या तीन पक्षांना जागा वाटप करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. आधीच ज्या आहेत त्या पक्षांना जागा देणे थोडे कठीण झाले आहे. त्यातच आता मनसेने महायुतीत आल्यानंतर जागांचा प्रश्न साहजिकच निर्माण होणार आहे. यात कोणतीही शंका नव्हती. सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार मनसेने दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेसाठी मागणी केली होती. परंतु शिर्डीत शिंदेनी आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे ती जागाही मनसेच्या हातून गेली. दक्षिण मुंबईसारख्या महत्वाच्या जागी शिवसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असताना मनसेला जागा मिळणे थोडे कठीणच आहे. आधीच आतली रस्सीखेच संपत नाही तोवर मनसेला जागा देणे जरा कठीणच आहे. असा पवित्रा सध्या महायुतीने घेतलेला दिसत आहे. त्यामुळेच मनसेची युती अडली असावी असे वाटत आहे.
त्यातच काही जणांचा नंबर हा जागांसाठी पटकन लागला असे देखील दिसून आले आहे. त्यामुळेच ही युती आता कुठेतरी अडल्याचे दिसून येत आहे.