Loksabha 2024 | च्या पार्श्वभूमीवर सध्या चांगलाच गोंधळ रंगलेला दिसत आहे. महायुतीत तर जागांचा तोडगा अद्याप निघालेला नाही. महायुतीत तिन्ही पक्षांचा काही जागांवरुन वाद अद्याप मिटलेला नाही. असे असताना काही जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले काही उमेदवार जाहीर केले आहे. यात कल्याणच्या जागेचा समावेश आहे. महायुती कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तिकीट देणार आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना (UBT) कडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पक्षाचे सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला आहे.

सुधीर पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट ) ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा अनेक पदांचा पदभार त्यांनी उत्कृष्ट रित्या सांभाळला आहे. एक सुशिक्षित,युवा, कार्यक्षम, आगरी चेहरा,सामान्यांची जाण असणारे उमेदवार म्हणून सुधीर पाटील यांच्या कडे पाहिले जात आहे. सुधीर पाटील यांच्या नावाला प्रचंड लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची निवडणूक अतिशय लक्ष वेधणारी असणार आहे.