MNS लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि तिकिटाची चर्चा सुरु असताना महायुतीच्या बाजूने लढणाऱ्या पक्षाने आता आपली बाजू मांडायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीच्या बाजूने असून त्यांनी या निवडणुकीत किमान 3 जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे. त्यापैकी दोन जागांसाठी सध्या सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या जागांसंदर्भात निर्णयही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
सध्या आपल्या पक्षाला जागा मिळावी यासाठी अनेक पक्षांची चढाओढ सुरु आहे. महायुतीत आलेल्या पक्षांना या निवडणुकीत आपल्याला जागा मिळेल अशी अपेक्षा आहे. मनसेने देखील महायुतीत जाऊन आपल्या जागांवर अडून आहे. मनसेने महायुतीकडून 3 जागांची मागणी केली आहे. या तीन जागांपैकी सध्या 2 जागांसाठी चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या जागांसाठीचे वाटप राज ठाकरे स्वत: करणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.