Rahul Gandhi यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे केले आहेत. या दरम्यान त्यांनी सत्ताधारी पक्षावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आज घेतलेल्या एका पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाकडे कोणताही पैसा राहिला नाही. एखाद्या कुटुंबासोबत जर असे झाले तर त्यांच्यावर मरणाची वेळ येईल तशी आज काँग्रेस पक्षावर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आज निवडणुका तोंडावर असतानाही आम्हाला काहीही करता येत नाही.आम्ही जाहिरातही करु शकत नाही असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
या कारणासाठी गोठवण्यात आली खाती
राहुल गांधी यांनी खाती का गोठवण्यात आली आहेत याची माहिती देखील दिली. त्यांनी सांगितले की, सात वर्षांपूर्वी 14 लाखांचा कर भरण्यात उशीर झाला होता. त्यासाठीच आमचे 200 कोटी रुपये असलेले खाते गोठवण्यात आहे. साधारणपणे कर भरण्यास उशीर झाला तर दंड ठोठावला जातो. अशा पद्धतीने खाते गोठवले जात नाही. आमचे खाते असे गुंडगिरी पद्धतीने गोठवणे हे आमच्या अधिकारांची पायमल्ली करण्यासारखे आहे. यामुळेच आम्हाला या काळात प्रचारासाठी आमच्या नेत्यांना कोणत्याही दौऱ्यावर दुसऱ्या राज्यात पाठवता आलेले नाही.
Rahul Shewale | राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका,खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा
ही लोकशाहीची गळचेपी
भारतात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातो. येथे प्रत्येक नागरिकाला आपली मत मांडण्याचा अधिकार आहे. असे असताना एक महिन्यापूर्वी आमच्या पक्षाला अशी वागणूक देऊन केंद्र सरकारने फार मोठी चुकी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी काँग्रेसची वेगवेगळ्या बँकांमध्ये असलेली खाती आणि त्या खात्यात असलेले 200 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. या संदर्भात कोणीही काहीही बोलायला तयार नाही.
शिवाय माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या 1994 च्या प्रकरणासंदर्भातही आम्हाला आता नोटीस बजावण्यात आली आहे. ही एक प्रकारची केंद्र सरकारकडून केली जाणारी गळचेपीच आहे असे म्हणायला हरकत नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.