धारावीचा विकास रोखू नकाधारावीचा विकास रोखू नका

Rahul Shewale केवळ राजकारण करण्यासाठी खोटी माहिती पसरवून धारावी पुनर्विकास प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा धारावीतील जनता आणि भावी पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, असा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale ) यांनी विरोधकांना दिला आहे. धारावीत सुरू झालेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल विरोधकांकडून केली जात आहे. यावर खासदार शेवाळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Priya Dutt | मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का, प्रिया दत्त पक्षातंराच्या मार्गावर | ELECTION 2024

18 मार्च रोजी धारावीतील कमला रमण नगर येथून धारावी पुनर्विकासासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात झाली. या सर्वेक्षणात धारावीतील प्रत्येक बांधकामाची नोंद बारकोडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. “पहिल्याच दिवशी या सर्वेक्षणाला धारवीकरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने विरोधकांचे अवसान गळाले आहे. म्हणून त्यांनी विनाकारण बिनबुडाचे आरोप करत जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरविण्यास सुरुवात केली आहे. कमला रमण नगर हा परिसर धारावी नोटिफाईड एरियाचाच भाग असून यापूर्वी देखील येथे एसआरएने सर्वेक्षण केले होते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नसून पुनर्विकास प्रकल्पाला खोडा घालण्याचा हा प्रयत्न त्यांनी थांबवावा” असे खासदार शेवाळे यांनी स्पष्ट केले. तसेच, धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला असल्याने येथील प्रत्येकाला घर मिळणार असून पात्र आणि अपात्र बांधकामांबाबत राज्य सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणून जनतेने खोट्या प्रचाराला बळी न पडता या सर्वेक्षणाला सहकार्य करावे, असेही शेवाळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *