Priya Dutta हा काँग्रेसचा चांगलाच प्रसिद्ध असा चेहरा आहे. पण ऐन निवडणुकीच्या या काळात मुंबईत काँग्रेसचा हाच चेहरा पक्षांतराच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रिया दत्त कोणत्या पक्षात जातील अशी चर्चा होत असताना यात शिवसेनेचे नाव पुढे येत असल्याचे देखील समजत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर अनेकांना धक्का बसणे अगदी स्वाभाविक आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर होताना आपण पाहिले आहे. मुरली देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे पसंत केले आहे. तर काहींनी पक्ष सोडून आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. आता त्यात प्रिया दत्त यांचे नाव जोडले गेले आहे. दिवगंत खासदार आणि प्रिया दत्त यांचे वडील सुनील दत्त यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त हिला काँग्रेसकडून खासदार करण्यात आले. मात्र आता यात प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे. असे झाले तर महायुतीला अधिक बळ मिळेल यात कोणतीही शंका नाही.
Vasant More | वसंत मोरेंनी मनसेला केला रामराम, म्हणाले…
सध्या नाहीत सक्रिय ELECTION 2024 (Priya Dutt)
प्रिया दत्त (Priya Dutta) सध्या जास्त सक्रिय दिसत नाही. त्या काही एनजीओच्या माध्यमातून आपली काही कामे करतात. समाजसेवा हीच त्यांच्यासाठी राजकारणासारखी आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करण्यावर त्यांनी कोणतेही मत नोंदवले नसले तरी देखील त्यांना उत्तर मुंबईत तिकिट देण्यात येणार असल्याची माहिती सगळीकडे आहे.
प्रिया दत्त या 2009 साली लोकसभा निवडणुकीतून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2014 आणि 2019 साली त्यांना पुनम महाजन यांनी हरवले होते. मोदी लाटेनंतर तर त्यांचे अस्तित्व बऱ्यापैकी कमीच झाले. आता त्या फारशा काही सक्रिय वाटत नाही. त्यांची आधी असलेली उत्तर मुंबईतील पकड कुठेतरी नक्कीच कमी झालेली दिसते.
आता त्यांचे पक्षांतर नवे कोणते वादळ आणेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.