Loksabha Election 2024 चे वारे सध्या संपूर्ण देशभरात वाहत आहे. सगळ्या पक्षांनी आपल्या कंबर चांगल्याच कसल्या आहेत. भारतात लोकशाही हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकांकडे लागलेले असते. काहीच वेळापूर्वी निवडणूक आयोगाचे राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 7 टप्प्यामध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. गेल्या वर्षभरात विविध राज्यांच्या 11 निवडणुका अत्यंत शांतमार्गाने पार पडल्या. अगदी तशाच या लोकसभा निवडणुकाही पार पडाव्यात अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
Vasant More | वसंत मोरेंनी मनसेला केला रामराम, म्हणाले…
सात टप्प्यात पार पडणार निवडणुका
लोकसभा निवडणुका देशात बदल घडून आणणाऱ्या असतात. त्यामुळे याकडे लोकांचे अधिक लक्ष असते. 2024 या वर्षात होणाऱ्या निवडणुकांकडे लोकांचे अधिक लक्ष लागून राहिले आहे. पुन्हा एकदा भाजप सरकार आपले सरकार टिकवण्यास यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यातील पहिल्या टप्प्यांमध्ये 21 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. तर पुढील टप्प्यात आणखी काही राज्य देखील जोडली जाणार आहेत. या लोकसभा निवडणुकांसोबत बिहार, गुजरात, हरयाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड या राज्यांच्या पोटनिवडणुका देखील पार पडणार आहेत. Loksabha Election 2024 19 एप्रिलला निवडणुका सुरु होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
तरुण मतदार वाढले Loksabha Election 2024
निवडणुक आयोगाकडून मतदान करु शकणाऱ्यांचा आकडा देखील जाहीर करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार तब्बल 96 कोटी इतके एकूण मतदार असून त्यामधील 19 कोटी हे तरुण मतदार आहेत.82 लाख मतदार हे प्राऊड मतदार आहेत. देशातल्या 12 राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या ही देखील अधिक आहे. या मतदारांचा परिणाम नक्कीच मतदानात होणार आहे यात कोणतीही शंका नाही. या शिवाय या यादीमध्ये तृतीय पंथी, 100 वय पार केलेले, दिव्यांजन अशांचाही समावेश आहे.
पैसै वाटप रोखण्यावर भर
निवडणुकांच्या या काळात मसल पावर, मनी पावर हे अधिक दाखवले जाते. अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे काम चालते. ते रोखण्यासाठी देखील एक विशिष्ट पथक नेमण्यात येणार आहे. जर असा अनुचित प्रकार घडत असेल तर त्याचा पुराव्यासाठीचा व्हिडिओ तयार करुन पाठवायचा आहे. असे केल्यास 100 मिनिटात पथक पोहोचून हा अनिष्ट प्रकार रोखता येण्याचा मानस आहे.
निवडणुंकांसदर्भातील अपडेट घेण्यासाठी तुम्ही Marathinewsflash फॉलो करा.