Vasant More सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लहान-मोठे भूकंप येताना दिसत आहे. त्यातच आता आणखी एक धक्का महाराष्ट्र नव निर्माण सेनेला बसला आहे. पुण्यातील वसंत मोरे यांनी पक्षाला अखेरचा राम राम केला आहे. वसंत मोेरे हे पुण्यातील मनसेचे बडे नेते आहेत. पण त्यांनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मोरे यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण देखील सांगितले आहे.
माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला
वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सांगितले की, मी इतके वर्ष या पक्षात अत्यंत निष्ठेने काम करत आहे. 15 वर्ष झाली तरीही या पक्षातून मला एकदाही तिकीट देण्यात आले नाही. इतकेच नाही तर मला पक्षाचे तिकीट मिळू नये यासाठी मात्र राजकारण करण्यात येत आहे. मी माझ्या परतीचे दोर कापले आहेत. मी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांशी बोललो आहे. पण मी मोठ्या नेत्यांचे फोनही उचलत नाही. माझ्याविरोधात अनेक कारवाया झाल्या आहेत. मला चुकीचे ठरवण्यात आले आहे. मी राज ठाकरेंकडे अनेकदा वेळ मागितला. पण मला त्यांच्याकडून कोणताही निरोप आला नाही. जर माझ्यावर असं राजकारण होणार असेल तर मनसे पुण्यामध्ये कसी राहणार? सध्या चुकीच्या लोकांच्या हातात शहर आहे.
लवकरच मांडेन भूमिका
सध्या वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांनी अद्याप कोणत्याही इतर पक्षात जाण्याची माहिती दिली नाही. ते लवकरच ते आपली भूमिका मांडणार आहेत असे देखील त्यांनी सांगितले आहे.