Sharad Pawar यांचे नाव बारामतीशी जोडले आहे. बारामतीत त्यांना खूप मान आहे. परंतु असे असतानाही बारामतीत आयोजित केलेला एक मेळावा व्यापारांनी अचानक रद्द केला. गेल्या 50 वर्षात असे कधीही झाले नाही ते झाले त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी ही खंत नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, मी व्यापारांचे प्रश्न सोडवणार होतो. परंतु त्या आधीच मेळावा रद्द झाला.
सोमवारी शरद पवार हे नियोजित अशा चार मेळाव्यांना जाणार होते. पण अचानक बारामतीत असलेला व्यापारांचा मेळावा हा रद्द झाला. तसे त्यांना पत्र देखील आले. अचानक असा मेळावा रद्द झाल्याचे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा झाले. त्यांनी ही झालेली घटना वकील मेळाव्यात सांगितली. त्यानंतर या चर्चांना उधाण आले. ते म्हणाले की, व्यापारी मेळाव्यात जाऊन मी त्यांचे प्रश्न सोडवणार होतो. परंतु व्यापारांनी मला मेळावा घेणे शक्य नसल्याचे सांगितले हे ऐकून त्यांना समोरच्यांचे ऐकून घ्यायचे नाही हेच लक्षात येते. Sharad Pawar
बारामतील वकील, होलार समाज आणि वैद्यकीय मेळावा करुन शरद पवारांना Sharad Pawar परत यावे लागले. त्यामुळे आता बारामतीत परिस्थिती बदलत आहे का हे जाणून घेणे गरजेचे ठरणार आहे.