Election 2024 सध्या लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शक्तिप्रदर्शन सुरु असताना चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवरांना उमेदवारी देण्यात आली आहे. याची एक प्रचारसभा नुकतीच चंद्रपुरात पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने सगळ्यांचेच लक्ष आकर्षून घेतले आहे. देशात काँग्रेस राहिलेली नाही. काँग्रेसला दिलेले मत हे राहुल गांधी यांना दिलेले असेल. देश कोणाच्या हातात द्यायला हवा याचा विचार करा असे ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ही राज्याची निवडणूक नाही तर देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निकालातून देश कोणाच्या हाती द्यायचा हे ठरणार आहे. ज्यांनी या देशात विकास घडवून आणला त्यांच्या हातात देश द्यायचा की, राहुल गांधीच्या हातात द्यायचा ही विचार करण्याची गोष्ट आहे. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधीनी आतापर्यंत जिथे जिथे प्रचार केला तिथे त्यांचा पराभव झाला किंवा हा पक्ष फुटला आहे असेच ऐकू येते. जिथे जाल तिथे फक्त नरेंद्र मोदी यांचे नाव ऐकू येते. जर तुम्ही काँग्रेसला मत दिलं तर ते मत राहुल गांधी यांना जाणार आहे.
फडणवीस यांनी यावेळी भाजपने नरेंद्र मोदींच्या हातातून केलेल्या कामांविषयीही सांगितले. ते म्हणाले की, महायुतीत सगळे पक्ष सामावले आहे. ज्यावेळी विरोधी पक्ष होतो त्यावेळीही अनेकांना सळो की पळो केलं. नेतृत्व आणि कर्तृत्व असे दोन्ही गुण आपल्या महायुतीत आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीने आणि नितीन गडकरी यांच्या साहाय्याने विदर्भाचा चेहरामोहरा बदण्याची ही आता वेळ आहे. या पुढे महायुतीचा फॉर्म चंद्रपुरातून भरायचा का? किंबहुना त्याची सुरुवात ही चंद्रपुरातून व्हायला हवी. यावेळी त्यांनी 400 पारचा नाराही आवर्जून दिला