child nutrition

चुकीच्या आहाराच्या सवयींचा मुलाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते. शिवाय, निरोगी खाण्याच्या सवयी पुढील आयुष्यात लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना प्रतिबंधित करतात. म्हणूनच मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी लावणे आवश्यक आहे. डॉ. अतुल पालवे, बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

पौष्टिक नाश्त्याने सुरूवात 

मुलांनी दिवसाची सुरुवात पौष्टिक न्याहारीने केली पाहिजे ज्यात प्रथिनांचा समावेश असेल कारण ते तुमच्या मुलास दीर्घकाळ समाधानी राहण्यास मदत करू शकते आणि किशोरवयीन मुलांना वजन व्यवस्थापनात मदत करू शकते. सकाळचे व्यस्त वेळापत्रक पाहता होल-व्हीट ब्रेड, स्मूदीज, दही, एवोकॅडो किंवा पीनट बटर आणि एग सँडविच सारख्या पर्यायांचा न्याहारीत समावेश करता येईल.

( वाचा – Diet Food | तुम्हीदेखील Fatty Liver ने झालात हैराण? नाश्त्यापासून जेवणापर्यंत खा सँपल डाएट)

खाण्याच्या सवयींकडे लक्ष

मुलांना घरातील किराणा खरेदी आणि खाद्यपदार्थ निवडण्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. पदार्थांचे पौष्टिक मूल्य समजून घेण्यासाठी  लेबल्सचा अर्थ कसा लावायचा याबद्दल शिक्षित करा. त्यांना जेवण तयार करण्यात सामील करा आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. घरच्या बागेत फळे, भाजीपाला आणि औषधी वनस्पती लावणे, त्यांचे संगोपन करणे याविषयी मुलांना प्रशिक्षण द्या.

(वाचा – Divorce Affect Child | या वयात आई-वडिलांचा घटस्फोट ठरतो मुलांसाठी धक्का, मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता)

नेहमी एकत्र जेवावे

निरोगी आहाराच्या सवयी वाढवण्याचा आणि कौटुंबिक बंध मजबूत करण्याचा मार्ग म्हणून संपूर्ण कुटुंबियांनी एकत्र जेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कुटुंबातील संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळते. तुमच्या मुलांच्या खाण्याच्या सवयींचे निरीक्षण आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जेवणाच्या वेळा निश्चित करा आण् एकतेर बसून जेक्षण करा. निरोगी खाण्याच्या सवयींचे निरीक्षण करून, तुम्ही तुमच्या मुलाला कॅलरी न ठरवता उत्तम आहाराती निवड करण्यास प्रेरित करू शकता.

(वाचा – Lord Rama Baby Names | रामनवमीच्या दिवशी ‘रामलला’साठी निवडा खास नावे, बाळांची अर्थासह नावांची यादी)

आहारात हळूहळू बदल करा 

एकाच वेळी संपूर्ण आहारात बदल न करता मुलाच्या आहारात हळूहळू बदल करा. तुमच्या स्वयंपाकघरातील काही अस्वास्थ्यकर पदार्थांना चांगल्या पर्यायांसह बदला, कालांतराने हळूहळू अधिक पौष्टिक पर्यायांचा समावेश करा ज्यात पांढरा ब्रेड ऐवजी मल्टीग्रेन ब्रेड, बटाटा चिप्स ऐवजी रताळ्याच्या भाजलेले चिप्स, आइस्क्रीम ऐवजी स्मूदी, डेझर्ट किंवा बेकरी पदार्थांच्या जागी घरी तयार केलेले पौष्टीक लाडू तसेच काजू, गूळ आणि खजूर यांचा वापर करा.

तळलेले पदार्थ टाळा 

पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की मुलाने तळलेले पदार्थ न खाता ग्रिलिंग, भाजणे आणि वाफेवर शिजवणासारख्या पर्यायांचा वापर करता येतो.  तुमच्या मुलांसाठी संतुलित आहाराची निवड करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *