How To Select Perfume सुंगधित राहावे, आपल्या शरीराला घामाची दुर्गंधी येऊ नये असे तरी आपल्याला वाटते. काही जणांसाठी परफ्युम लावणे ही एक आवड असते. तर काही जणांसाठी ते एक रोजचे रुटीन असते. जर तुम्हालाही नव्याने परफ्युम घ्यायचा असेल तर तुम्ही काही गोष्टींची माहिती ठेवायला हवी किंवा तुम्ही जो परफ्युम निवडताय तो निवडताना देखील तुम्हाला त्याची योग्य माहिती हवी. परफ्युम निवडणे हा जरी आपल्या आवडीचा भाग असला तरी चारचौघात फिरताना तुम्ही निवडलेला परफ्युम हा इतरांना त्रास देणारा नसावा हे देखील तितकेच खरे आहे. परफ्युम निवडताना कोणत्या 10 गोष्टींची काळजी घ्यायला हवी. याची अधिक माहिती आपण आता घेऊया.
डिलीव्हरीनंतर नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करताना |WEIGHT LOSS AFTER DELIVERY NATURALLY,5 TIPS
HOSPITAL MATERNITY BAG | डिलीव्हरीला जाण्यापूर्वी अशी भरा बॅग 5+
परफ्युम म्हणजे काय?
आता सगळ्यात आधी पडणारा प्रश्न. कारण डिओ आणि परफ्युममध्ये खूपच गोंधळ असतो. कारण कोणती गोष्ट आपल्यासाठी हे अनेकदा कळत नाही. आता याचा अर्थ असा नाही की या दोन्ही गोष्टीमध्ये तुमचं काय ते ठरवणं कठीण आहे. यातील फरक हा तुमच्या वापरावर असतो. ज्यांना खूप घाम येतो. त्यांच्यासाठी डिओड्रंट हे अधिक चांगले काम करतात. कारण घामाची दुर्गंधी रोखण्याचे काम हे डिओ करत असतात. डिओ हे काखेत लावले जाते. त्यामुळे घाम कमी येतो आणि त्याची दुर्गंधीही कमी होते. तर परफ्युमचे काम तुम्हाला अधिक सुगंधित करण्याचे असते. याचे काम तुमचा घाम रोखणे किंवा दुर्गंधी कमी करणे असे नसते. परफ्युम हा तुमच्या पल्स पॉईंटवर लावला जातो. उदा. कामाच्या मागे, मानेवर, मनगटावर इ.
परफ्युम निवडताना 10 गोष्टी ठेवा लक्षात How To select Perfume
परफ्युम निवडताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते आता जाणून घेऊया.
- तुम्ही कोणते काम करता त्यावर तुमच्या परफ्युमची निवड असायला हवी. काही जणांना खूपच उग्र वासाचे परफ्युम आवडतात. पण जर तुम्ही एखाद्या मिटींगसाठी किंवा कामासाठी भेटायला जात असाल तर अशावेळी असे परफ्युम टाळा. कारण जर तुम्हाला घाम आलेला असेल तर अशावेळी या परफ्युमचा वास हा विचित्र येऊ लागतो.
- कोणत्याही डेटवर जाताना तुमचा परफ्युम मस्की, फ्लोरल असा असायला हवा. तो माईल्ट असतो. जो अधिक लावल्यासारखा वाटत नाही. त्यामुळे आपल्या डेट किंवा काही खास दिवसांसाठी चांगले लाईट परफ्युम निवडा.
- काही जणांना घरात किंवा खूप जवळच्या जवळही खूप परफ्युम मारायला आवडते. परफ्युम जर सतत लावायला आवडत असेल तर त्याचा सुगंध माईल्ड असायला हवा. त्याचा उग्र दर्प येता कामा नये.
- परफ्युमची निवड ही खरतरं प्रत्येकावर अवलंबून असते. पण तरीही मुलींनी शक्यतो खूप स्ट्राँग मेल परफ्युम निवडू नयेत. कारण ते अनेकदा तुमच्या पर्सनॅलिटीला शोभत नाही.
- खूप जणांना एकावेळी दोन ते तीन परफ्युम मारायची सवय असते. ही सवय देखील चांगली नाही. त्यामुळे तुमचा सुगंध हा नीट कळत नाही.
- परफ्युम ही तुमची पर्सनॅलिटी ठरवत असते. तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी दाखवायची हे अवलंबून असते. तुमचा सुगंध हा तुमच्या पर्सनॅलिटीला साजेशा हवा.
- हल्ली अनेक ब्रँड तुम्हाला जागच्या जागी तुमच्या आवडीनुसार परफ्युम बनवून देतात. ते देखील तुम्हाला चांगला सुगंध निवडण्यासाठी मदत करु शकतात.how to select perfume
- एखादा परफ्युम ही तुमची सवय असते. तीच तुमची ओळख असते. त्यामुळे जर तुम्ही तो बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची पर्सनॅलिटी नक्की विचारात घ्या.
- काही फुलांचे सुगंध हे खूपच उग्र असतात जसे की, मोगरा, जास्मिन अशा फुलांच्या सुगंधाचे परफ्युम घेताना थोडे जपून कारण त्याचा सुगंध हा वर वर चांगला असला तरी तो इतरांच्या अंगावर आल्यासारखा होतो.
- कोणताही तुमच्या आवडीचा परफ्युम घेताना तुम्ही त्याची पॅच टेस्ट घ्या. ती पेपरवर घेण्यापेक्षा तुमच्या थेट मनगटावर मारुन घ्या. कारण त्यामुळे तो तुमच्या त्वचेवर कसा जातोय. तो इतरांना कसा वाटतोय ते देखील अनुभवा. तुम्हाला त्या वासामुळे कोणता त्रास होत नाही ना? कारण खूप जणांना त्यामुळे डोकेदुखी होते. अशावेळी तो परफ्युम हा टाळलेलाच बरा असतो. how to select perfume
परफ्युम निवडणे how to select perfume ही सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असले तरी काही गोष्टींची काळजी घेणे हे नेहमीच चांगले.
5+ Dandruff Solution | केसातील कोंडा खूपच वाढलाय, वाचा सोप्या टिप्स