Yoni Mudra ही हस्तमुद्रा प्रकारातील एक मुद्रा आहे. योगामध्ये या मुद्रेला खूपच जास्त असे महत्व आहे. जर तुम्ही योगा नित्यनेमाने करत असाल तर ही मुद्रा किती शक्तीशाली आहे हे तुम्हाला माहीत असेलच. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी या मुद्रेची माहिती घ्यायला हवी. ही मुद्रा केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळण्यास मदत मिळते.जर तुम्हाला योगा आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांवर विश्वास असेल तर तुम्ही याची अधिक माहिती नक्कीच घ्यायला हवी. चला जाणून घेऊया ही मुद्रा नेमकी कशी करतात? आणि त्याचे फायदे काय आहेत.
BramhaMuhurta| काय आहेत ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे फायदे
योनी मुद्रा | Yoni Mudra
तंत्र योगाचा भाग असलेली ही मुद्रा अनेक ठिकाणी शिकवली जाते. पण ती शिकताना केवळ हातांची बोटे जोडणे आणि बसणे हे इतकेच नसते. तुम्हाला त्याचा खरा फायदा हवा असेल तर त्या मुद्रेवर तुम्हाला तितका विश्वास ठेवणे गरजेचे असते. या मुद्रेमध्ये हातांचे दोन्ही अंगठे आणि तर्जनी या दोन बोटांची टोेके ही जोडली जातात आणि उरलेली बोट ही एकमेकांना उलट बाजूने एकत्र जोडायची असतात. ही मुद्रा केवळ योगिक जेस्चर नाही तर त्याचे काही फायदे आहेत जे माहीत झाले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होण्यास मदत मिळेल.
योनी मुद्राचे फायदे
योनी मुद्रा ही महिलांसाठी अत्यंत चांगली आहे असे मानले जाते. ही मुद्रा काही खास आसनांसोबत करण्याचे काही फायदे आहेत.
- योनी मुद्रा ही तुमच्या गर्भाशयाला उर्जा देण्याचे काम करते. ही मुद्रा तुम्ही केली तर असे म्हणतात की, तुमच्या pelvic regionमध्ये मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते. जे बाळ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
- ही मुद्रा लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करते. जर तुमचे कोणत्या कामात मन रमत नसेल अशावेळी मनाला शांत करुन ते एका ठिकाणी केंद्रित करण्यासाठ तुम्ही योनी मुद्रा करायला हवी.
- जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर तुम्ही ही मुद्रा करायला हवी. ही मुद्रा केल्यामुळे तुम्हाला आंतरिक शांतता मिळण्यास मदत मिळते.
- महिलांसाठी ही मुद्रा अत्यंत चांगली मानली जाते कारण महिलांना लक्ष केंद्रित करण्यास, त्यांच्यातील उर्जा अबाधित ठेवण्यास ही मुद्रा मदत करते.
- योनी मुद्रा ही तुमच्यामधील नम्रता वाढवण्यासही मदत करते.
योनी मुद्रा ही नक्कीच तुमच्या योग गुरुकडून किंवा ज्यांना याची माहिती असेल त्यांच्याकडून करावी. कारण योग्य पद्धतीने मुद्रा करणे हे अधिक गरजेचे असते.