Dandruff Solution आपल्यापैकी कित्येक जणांना हवा असेल. कारण केसातील कोंडा हे 10 पैकी 9 जणांसाठी त्रासदायक ठरत असतो. तुम्हीही कोंड्याच्या त्रासाने हैराण असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला आज आम्ही तुमच्या हट्टी कोंड्याला बाय बाय कसे करायचे? याच्या काही टिप्स देणार आहोत. कोंड्याच्या समस्याने त्रस्त असाल तर थोडासा वेळ घेऊन तुमच्या केसांची अशी काळजी घेतली तर तुम्हाला कोंड्याची समस्या अजिबात उद्धभवणार नाही याची गॅरेंटी आम्ही घेतो. चला करुया सुरुवात.
कोंडा का होतो? Dandruff Solution
कोंडा का होतो यामागील कारण तुम्हाला सगळ्यात आधी माहीत असायला हवे. कारण अनेकदा आपल्याला त्यामागील कारण माहीत नसते आणि आपण आधीच उपाय सुरु करतो. ज्याचा काहीही उपयोग नसतो. काही जणांचा कोंडा हा अनुवंशिक असतो. असा कोंडा काही केल्या जात नाही. त्याचा त्रास कमी करता येतो. पण तो मुळापासून जाणे फारच कठीण असते. तर काही जणांना काही ठराविक हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर कोंडा होतो. काही जणांना वातावरणातील बदलानुसार कोंडा होतो. आता ही झाली त्यामागील काही कारणं. आता या कारणांनुसार तुम्हाला उपाययोजना करणेही गरजेचे असते. (Dandruff Solution )
असा घालवा तुमच्या केसांमधील कोंडा
तुमच्या केसांमधील कोंडा घालवायचा असेल तर काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच कामी येतील.
- जर तुमची स्काल्प कोरडी झाली असेल आणि त्यानंतर तुम्हाला कोंड्याचा त्रास सुरु झाला असेल तर तुम्ही केसांना कोरफडीचा गर लावू शकता. केस धुण्यासाठी तुम्ही थोडासा कोरफडीचा गर घेऊन तो केसांच्या मुळांना लावून मसाज करा. साधारण 1 तास तो तसा मुरु द्या त्यानंतर केस कोणत्याही माईल्ड शॅम्पूने केस धुवा. तुमच्या कोंड्याचा त्रास कमी होईल.
- कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात जे अँटीसेप्टीक आणि अँटीबॅक्टेरिअल असतात. त्याचा उपयोग सबंध शरीरात कुठेही केला तरी देखील चालू शकतो. कडुनिंबाची पाने घेऊन ती पाने चांगली पाण्यात उकळून घ्या. कडुनिंबाचा अर्क त्यात उतरल्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. त्या पाण्याने केस धुवा. त्यामुळे केसांमध्ये कोंड्यामुळे तयार झालेल्या खरपुड्या कमी होण्यास मदत मिळते.
- हल्ली बाजारात अनेक ठिकाणी शुद्ध असे टी ट्री ऑईल मिळते. त्याचे काही थेंब घेऊन ते कोणत्याही शॅम्पूमध्ये घालून केस धुतले तर त्यामुळे केस स्वच्छ होतात शिवाय केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळते.
- बाजारात हल्ली खूप माफक दरात उत्तम शॅम्पू मिळतात. त्याच्या एका वापरामुळे कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. असे शॅम्पू वापरले तरी देखील तुम्हाला थोडासा आराम मिळू शकतो.
- ज्यांना कोंडा हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्यांच्या केसांमध्ये कोंड्याची खपली निघू लागली असेल तर तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांना ते दाखवायला हवे. म्हणजे तुम्हाला त्यापासून लवकरात लवकर सुटका मिळवता येईल. कारण हा कोंडा वाढत राहिला तर तुमचे केस गळण्याची शक्यता अधिक असते.
आता कोंडा झाला असेल तर त्यामागील कारणे ओळखून तुम्ही घरगुती काही सोपे उपाय नक्की करा.