Winter Hair Tips सध्या सगळीकडे वातावरणात चांगलाच थंडावा जाणवून लागला आहे. हिवाळ्यातील वातावरण कितीही अल्हाददायक असले तरी या दिववसात केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुनही चालत नाही. हिवाळ्यात केसात कोंडा होणे, केस तेलकट होणे, केस गळती होणे अशा समस्या अगदी हमखास जाणवतात. त्यावर वर वर उपाय करुन काहीही उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला आतून काळजी घेणेही गरजेचे असते. याच दिवसात अनेक लग्नसमारंभ आणि सोहळे असतात अशावेळी केसांशिवाय सौंदर्य ते कसले म्हणूनच हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. Winter Hair Tips
Winter Hair Tips
हिवाळ्यात वातावरणात थंडावा आलेला असतो. त्यामुळे त्वचा कोरडी होेणे, केस कोरडे वाटणे अशा समस्या उद्भवतात. केसांचे सौंदर्यच जणून या काळात नष्ट होत असते. केसांचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी केसांची काळजी तुम्ही कशी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
- केसांची वर वर काळजी घेण्यासोबत आतून काळजी घेणे ही खूपच जास्त गरजेचे असते. केस चांगले राहावे असे वाटत असेल तर तुम्ही पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात करायला हवे. हिवाळ्यात तहान फारच कमी लागते त्यामुळे पाणी पिणे होत नाही.ही चुकी करु नका. तुम्ही योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करा. ( Winter Hair Tips )
- कथंडीत गरम पाण्याची आंघोळ ही सुखावणारी असते. पण केसांसाठी हेच गरम पाणी चांगले ठरत नाही जर तुम्ही गरम पाण्याने केस धुत असाल तर त्यामुळे तुमचे केस कोरडे होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे या दिवसात केसांना गरम पाण्याची आंघोळ टाळा.

- खूप जणांना अगदी रोज केस धुण्याची सवय असते. पण सतत केस धुतल्यामुळे केसांमधील मॉईश्चर कमी होऊ लागते. त्याचा परिणाम केस कोरडे दिसू लागतात.
- हिवाळ्यात तुमच्या केसांची गरज ही वेगळी असतेय या दिवसात तुम्ही केसांसाठी वापरणारे प्रॉडक्टस सुद्धा बदलायला हवेत. जर तुम्ही स्काल्प ड्राय करणारे शॅम्पू वापरत असाल तर त्याचा वापर तिथेच थांबवा.
- ओले केस तसेच ठेवणे आणि विंचरणे टाळा त्यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते.
- जर तुमचे केस अगदी दोन दिवसात तेलकट होत असतील तर अशावेळी योग्य डॉक्टरांकडून सल्ला घेऊन त्या प्रमाणे तुम्ही शॅम्पू वापरा.
- स्काल्पला अगदी रोजच्या रोज मसाज करा त्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते त्यामुळेही तुमचे केस चांगले राहण्यास मदत मिळते.
- चांगला आहार हा आरोग्यासाठी चांगला असतो हे आपण जाणतो. तुमचा आहार उत्तम असेल तर तुम्हाला या समस्या जाणवणार नाहीत.
- या दिवसात तुम्ही केस थोडे थोडे कापले तरी देखील केसांची काळजी घेणे सोपे जाते. Winter Hair Tips
- हिवाळ्यात केसांवर मशीनचा अधिक प्रयोग करु नका. कारण त्यामुळेही केस ड्राय होण्याची शक्यता अधिक असते.
या काही सोप्या गोष्टी फॉलो करुन तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता.