अमृता फडणवीस | Amruta Fadnavisअमृता फडणवीस | Amruta Fadnavis

Amruta Fadnavis हे फक्त नावंच पुरेसं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव असले तरी त्यांच्या गृहलक्ष्मी अर्थात अमृता फडणवीस याही कुठेही कमी नाहीत. गाणं असो वा फॅशन त्या कुठेच मागे नाहीत. त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांना सोशल मीडियावर कितीही ट्रोल करण्यात आले तरी देखील त्या कुठेही थांबताना अथवा खचताना दिसत नाहीत. उलट त्या दिवसेंदिवस त्यांचे कार्य सुरुच ठेवत आहेत. बँकिग क्षेत्रातून आलेल्या अमृता फडणवीस यांचे नाव आता संगीत क्षेत्रात आणि फॅशनच्या दुनियेतही घेतले जाते. इंडो-वेस्टर्न अशा दोन्ही फॅशन स्टाईलमध्ये सहजगत्या वावरणाऱ्या Amruta Fadnavis यांच्या काही खास लुकविषयी अधिक माहिती घेणार आहोत. त्यांच्या या काही फॅशनने सगळ्या सोशल मीडियाला घायाळ केले आहे.

Manasi Naik | ‘लावण्यवती’तील तिसरी लावणी प्रेक्षकांच्या भेटीला, मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’

So Beautiful,So Elegant

अमृता फडणवीस यांचा हा लुक खूप सुंदर आणि एलिगंट आहे. त्यांनी घातलेला काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस खूपच सुंदर आहे. पार्टीवेअर आणि बॉडी हगिंग असा हा ड्रेस असून त्यावर त्यांनी घातलेली डायमंड ज्वेलरी ही देखील खूपच सुंदर आहे. या लुकला एक रिचलुक देण्याचे काम करत आहे ती म्हणजे ही हेअरस्टाईल. जी साधी असली तरी खूपच रिच अशी आहे. Amruta Fadnavis

Boss Lady

अमृता फडणवीस या कायमच बॉस लेडीप्रमाणे वावरतात. त्या फॉर्मलवेअरवर कायम दिसून आल्या आहेत. आता त्यांचा हाच लुक पाहिला तर आम्ही त्यांना Boss Lady अशी उपमा का दिली आहे ते तुमच्या लक्षात येईल. यामध्ये त्यांनी घातलेला सिक्वेनचा काळ्या रंगाचा सूट घातला आहे. आत त्यांनी क्रॉप टॉप घालून त्याला थोडा फॅन्सी असा टच दिला आहे. मिनिमल ज्वेलरी आणि मेकअपमुळे त्या अधिक उठून दिसत आहेत.

Sassy Red Beauty Amruta Fadnavis

रोजच्या सूटला दिलेला हा रेड कार्पेट टच खूपच सुंदर दिसत आहे. एरव्ही आपण शॉर्ट असे जॅकेट किंवा फार फार नी लेंथ असे जॅकेट पाहतो. पण या सूटलाच थोडासा वेस्टर्न टच देणारा असा लाँग कोट आणि रेड कलर अमृता फडणवीस यांच्या लुकला अगदीच सॅसी बनवत आहे. यात त्यांचा कॉन्फिडन्सही चांगलाच बुस्ट दिसतोय. पुन्हा एकदा मिनिमल ज्वेलरीने त्यांनी चांगलाच भाव खाल्लेला दिसत आहे.

Saree Queen

अमृता फडणवीस या जितक्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतात तितक्याच त्या आपल्या संस्कृतीला जपणाऱ्या कपड्यांमध्येही दिसतात. साडी ही त्यांची कायम पहिली पसंती आहे असे त्यांच्या काही फोटोजवरुन दिसून येते. आता हीच साडी पाहा ना लिंबू कलरची ही साडी अमृतावर खूपच जास्त खुलून दिसत आहे. यातही त्यांनी मिनिमल असा लुक केला आहे. थ्री फोर्थ स्लीव्हज असलेला असा ब्लाऊज आणि त्यावर ही प्रिंटेट साडी कोणत्याही स्त्रीला आकर्षित करेल अशी आहे.

Red carpet Beauty

अमृतांनी घातलेला हा पार्टी कॉकटेल ड्रेस हा एखाद्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल असा आहे. लाँग गाऊन प्रकारातील हा ड्रेस जितका फॅशनेबल आहे तितकाच तो एलिगंटसुद्धा आहे. यात परफेक्ट ज्वेलरी आणि मेकअपमुळे तो लुक अधिक चांगला दिसत आहे. सिक्वन प्रकारातील हा ड्रेस असल्यामुळे यावर ज्वेलरी मॅच करताना त्यांनी डायमंडचा केलेला वापरही सुरेख आहे.

एकूणच फॅशन उत्तम कॅरी करणे हे त्यांना चांगलेच जमते हे त्यांच्या या काही फोटोजमधू नक्कीच दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *